मुंबई : टी.व्ही कलाकारांच्या प्रसिद्ध जोड्यांपैकी माही विज आणि जय भानुशाली ही अत्यंत प्रसिद्ध जोडी आहे. काही दिवसांपूर्वी माहीने सुंदर मुलीला जन्म दिला आहे. आपल्याला मुलगी हवी असल्याची इच्छा जयने फार पूर्वी व्यक्त केली होती. त्याच्या इच्छेनुसार त्यांना कन्यारत्न प्रप्त झाले आहे. अभिनेत्री माहीने तिच्या मुलीचा पहिलाच फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिच्या फोटोवर चाहत्यांकडून त्याचप्रमाणे सेलेब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माहीने मुलीचा फोटो शेअर करत चाहत्यांकडेच आपल्या मुलीच्या नावासाठी विचारणा केली आहे. तिच्या या पोस्टला चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहे. इन्स्टाग्रामवर चिमुकलीचा फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये, 'बेबी गर्लचं नाव ठेवण्यासाठी 'ट' आणि 'म' असं नावरस आहे. त्यामुळे तुम्हाला चांगले नाव सुचत असेल तर आम्हाला नक्की सांगा.' असे तिने लिहीले होते. 


८ वर्षांपूर्वी जय-माही विवाह बंधनात अडकले होते. २०११मध्ये त्यांचे लग्न झाले होते. या जोडप्याने एक मुलगा आणि एका मुलीला दत्तक घेतले आहे. ही दोन्ही मुलं त्यांच्या आई-वडिलांकडे राहतात. परंतू त्यांच्या शिक्षणाची आणि खर्चाची जबाबदारी जय-माहीने घेतली आहे.