भारतात HMPV चा पहिला रुग्ण सापडला.. या आजाराची 5 महत्त्वाची लक्षणं कोणती? समजून घ्या

What Is HMPV Virus Symptoms: चीनमध्ये थैमान घालत असलेल्या या विषाणूचा संसर्ग झालेला पहिला रुग्ण भारतात आढळून आला असतानाच या विषाणूच्या संसर्गाची लक्षणं काय आहेत ते जाणून घेऊयात...

| Jan 06, 2025, 12:03 PM IST
1/10

hmpvsymptoms

ह्यूमन मेटान्यूमोव्हायरस (HMPV) विषाणूचा संसर्ग झालेला पहिला रुग्ण भारतात आढळून आला आहे. त्यामुळेच या विषाणूच्या संसर्गाची लक्षणं काय आहेत हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. त्यावरच टाकूयात नजर...

2/10

hmpvsymptoms

बंगळुरुमधील एका 8 महिन्यांच्या चिमुकलीला ह्यूमन मेटान्यूमोव्हायरस (HMPV) चा संदर्भ झाल्याचं समोर आलं आहे. हा भारतामधील या विषाणूचा पहिला रुग्ण आहे. 

3/10

hmpvsymptoms

कोरोनाचं सावट जगावरून दूर झालंय असं वाटत असतानाच आता ह्यूमन मेटान्यूमोव्हायरसचा (HMPV) चीनमध्ये जोरदार प्रादर्भाव झाला आहे. या नव्या विषाणूच्या संसर्गानं साऱ्या जगाची चिंता वाढवली आहे. चीनमध्ये या विषाणूचा संसर्ग गंभीर रुप धारण करत असतानाच कोरोनासारख्याच या विषाणूच्या संसर्गाशी दोन हात करण्यासाठी भारतातही आरोग्य यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. अशातच या विषाणूचा संसर्ग झालेला पहिला रुग्ण भारतात आढळून आला आहे.

4/10

hmpvsymptoms

ह्यूमन मेटान्यूमोव्हायरस (HMPV) आणि श्वासाशी संबंधित इतर व्याधींशी दोन हात करण्यासाठी नुकतेच दिल्लीतील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. महाराष्ट्रातही सतर्कता बाळगत आरोग्य विभागानं सदर प्रकरणी सावधगिरीची पावलं उचलल्याचं पाहायला मिळत आहे.   

5/10

hmpvsymptoms

घाबरू नका, पण सावध राहा असा सल्ला राज्यातील आरोग्य विभागाच्या वतीनं नागरिकांना देण्यात येत आहे. सोबतच सर्दी आणि खोकल्याच्या रुग्णांचा नियमित सर्वेक्षण करण्याचे आदेशही अधिकाऱ्यांना देण्यात आले असून, राज्यात सर्वांनीच स्वच्छतेच्या नियमावलीचं पालन करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. मात्र या HMPV संसर्गाची लक्षणं काय आहेत हे पाहूयात...  

6/10

hmpvsymptoms

खोकला हे या संसर्गाचं सर्वात प्राथमिक लक्षण आहे.

7/10

hmpvsymptoms

ताप येतो.

8/10

hmpvsymptoms

नाक चोंदण्याची समस्या जाणवते. 

9/10

hmpvsymptoms

घसा कोरडा पडणे. 

10/10

hmpvsymptoms

श्वास घेताना त्रास जाणवतो.