मुंबई : अलिकडे ब्रेकिंग न्यूज म्हटलं की प्रत्येकाच्या मनात धडकी भरते, कशा संदर्भात न्यूज आहे. त्याचा आपल्या जीवनावर काही परिणाम होणार तर नाही न... असे अनेक प्रश्न एका क्षणांत उभे राहतात. ब्रेकिंग न्यूज असेल तर निवेदक कशाप्रकारे ती बातमी जनतेसमोर सादर करतो. त्याचे हाव-भाव इत्यादी गोष्टी लक्षात घेत. सर्वांसमोर 'ब्रेकिंग न्यूज' येते. कोरोना व्हायरसमुळे सध्या लाखो कर्मचारी वर्क फ्रॉम होम करत आहेत. तर वृत्तनिवेदक वर्क फ्रॉम होम करू लागले तर ते कशाप्रकारे बातम्या देतील. यावर भाष्य करणारी 'नो ब्रेकिंग न्यूज' ही वेब मालिका "व्हायरस मराठी"वर सुरू झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


अभिनेत्री शर्मिला राजाराम शिंदे ही "व्हायरस मराठी" या प्रसिद्ध युट्युब चॅनेलवरील 'नो ब्रेकिंग न्यूज' या नव्या शोमध्ये वृत्तनिवेदिकेची भूमिका करत आहेत.  सादरीकरणाची पद्धत आणि त्यातला तोच तोचपणा याला कंटाळून चक्क बातम्या देताना तांदूळ निवडण्याचे काम शर्मिला राजाराम करताना दिसत आहे. कंटाळवाण्या बातम्यांमध्ये रंग भरण्यासाठी शर्मिलाने चक्क तांदूळ निवडत बातम्या दिल्या आहेत.


विविध विषयांवरील बातम्या सांगण्याच्या शर्मिलाच्या शैलीला प्रेक्षकांकडून चांगलीच दाद मिळत आहे. शिवाय मालिकेला तरुणांकडून उत्तम प्रतिसाद मिळतो आहे.व्हायरस मराठीच्या या वेब शोचे लेखन, युगंधर देशपांडे यांनी केले असून दिग्दर्शन संतोष कोल्हे यांनी केले आहे


"नो ब्रेकिंग न्यूज" चे आतापर्यंत २ एपिसोड व्हायरस मराठीवर प्रदर्शित झाले असून त्याचा तिसरा एपिसोड शुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आता हा भाग प्रेक्षकांचं किती मनोरंजन करेल हे पाहणं मजेशीर ठरणार आहे.