#MeToo `या` अभिनेत्रीचे पुन्हा Sajid khan वर गंभीर आरोप, उपस्थित केला `हा` सवाल
बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून साजिद खानला संधी दिल्यावर तिनं नाराजी व्यक्त केली आहे आणि म्हणाली की #MeToo आरोपीला अशी संधी द्यायला नको होती.
Sherlyn Chopra On Sajid Khan: अभिनेत्री शर्लिन चोप्रा #MeToo मुळे प्रसिद्ध झाली होती. गेल्या काही काळापासून शांत असणारी शर्लिन चोप्रा पुन्हा एकदा माध्यमांसमोर #MeToo चा नारा देत आहे. बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून साजिद खानला संधी दिल्यावर तिनं नाराजी व्यक्त केली आहे आणि म्हणाली की #MeToo आरोपीला अशी संधी द्यायला नको होती. शर्लिन म्हणाली की, 'इतक्या वर्षात पोलिसांकडे जाण्याची हिंमत माझ्यात नव्हती, पण #MeToo चळवळीने तिला साजिदविरोधात आवाज उठवण्याची हिंमत दिली. (actress sherlyn chopra again makes serious allegations against sajid khan MeToo nz)
शर्लिन चोप्राची साजिद खान विरोधात तक्रार
शर्लिन चोप्रा चित्रपट निर्माता साजिद खान विरोधात तक्रार करण्यासाठी मुंबईतील जुहू पोलीस ठाण्यात पोहोचली. तिनं रडत रडत प्रसारमाध्यमांना सांगितले की, 19 ऑक्टोबर रोजी पोलिसांकडे तक्रार पत्र देऊनही पोलिसांनी आजतागायत त्यांचा कोणताही अहवाल लिहिलेला नाही किंवा तिचे म्हणणेही नोंदवले नाही. जोपर्यंत पोलिस तिची जबानी नोंदवत नाहीत तोपर्यंत ती जुहू पोलिस ठाण्यातून परतणार नसल्याचे शर्लिनने म्हटले आहे.
हे ही वाचा - Baba Vanga नाहीतर चक्क Kangana Ranaut ने केली होती ट्विटर संदर्भात भविष्यवाणी, आणि घडलं ही तसंच
साजिद खानवर अद्याप कारवाई नाही
शर्लिन चोप्रा म्हणाली की, लैंगिक छळाचा एवढा मोठा आरोपी साजिद खानवर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही, ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट असून पोलिसांनी त्याला लवकरात लवकर पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावले पाहिजे. अभिनेत्री रडत रडत म्हणाली की ही घटना 2005 मध्ये घडली असली तरी तिच्यासोबत काय झाले आणि या घटनेचा तिच्यावर काय परिणाम झाला हे शब्दात वर्णन करणे तिच्यासाठी खूप कठीण आहे.
हे ही वाचा - श्रीदेवी यांनी चित्रपटांत काम न करण्याचा निर्णय का घेतला? जाणून घ्या
शर्लिनचा व्यक्त केला राग
शर्लिनच्या म्हणण्यानुसार, 'पोलिस कर्मचाऱ्याने साजिद खानविरोधात तक्रार आणि वक्तव्य न नोंदवणे धक्कादायक आहे आणि तिला जाणून घ्यायचे आहे की पोलिस कोणाच्या दबावाखाली काम करत आहेत? सलमान खान, साजिद खान की कलर्स वाहिनी? शर्लिनचे म्हणणे आहे की तिने जुहू पोलिसांकडे तक्रार आणि स्टेटमेंट रेकॉर्ड न केल्याबद्दल एसीपी आणि डीसीपी यांच्याशी संपर्क साधला आहे आणि त्यांची मदत घेतली आहे.
हे ही वाचा - कंगना राजकरणात प्रवेश करण्यासाठी सज्ज...माध्यमांसमोर केला खूलासा
या प्रकरणाची सुरुवात
शर्लिनने सांगितले की, 'साजिद खानने तिला 2005 मध्ये एका चित्रपटात काम देण्याच्या विचाराने एका ठिकाणी बोलावले आणि तिच्याशी आक्षेपार्ह बोलले'. शर्लिन चोप्राने तिच्या सर्व आरोपांचा पुनरुच्चार करताना, तिने सर्व कलमांबद्दल कॅमेऱ्यावर सांगितले ज्यात तिने एका लेखी अर्जाखाली साजिदविरुद्ध तक्रार करण्याची विनंती केली आहे.