Shilpa Shinde: टीव्ही अभिनेत्री शिल्पा शिंदे ही खूप लोकप्रिय अभिनेत्री आहे. 'भाभीजी घर पर है' या मालिकेने तिला प्रचंड प्रसिद्धी मिळवून दिली आहे. या मालिकेत तिने 'अंगूरी भाभी'ची भूमिका साकारून शिल्पा घराघरात पोहोचली. शिल्पा शिंदेने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. त्याचबरोबर तिने काही सिनेमांमध्ये देखील काम केलं आहे.  सध्या शिल्पा शिंदे ही 'खतरों के खिलाडी 14' या रिअॅलिटी शोमध्ये दिसत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, न्यायमूर्ती समितीच्या अहवालामध्ये अनेक अभिनेत्यांनी लैंगिक छळ केल्याचा खुलासा केला आहे. अशातच आता अभिनेत्री शिल्पा शिंदेने देखील मोठा खुलासा केला आहे.  करिअरच्या सुरुवातीच्या काळात शिल्पाला सिनेइंडस्ट्रीत वाईट अनुभव आला होता. याबद्दल नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने यावर भाष्य केलं. 


शिल्पा शिंदेने काय केला आरोप? 


न्यूज 18 ला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री शिल्पा शिंदेने मोठा खुलासा केला आहे. अभिनेत्री म्हणाली की, 1998-99 ची गोष्ट आहे जेव्हा मी इंडस्ट्रीत करिअर करण्यासाठी आले होते. मी त्यांचं नाव घेणार नाही. पण ते मला म्हणाले की तू हे कपडे घाल आणि सीन कर. त्यावेळी मी त्यांनी दिलेले कपडे घातले नाहीत. त्यांनी मला सांगितलं की सीनमध्ये ते माझे बॉस आहेत आणि मला त्यांना खूश करायचं आहे. परंतु त्यावेळी मला काही कळत नव्हतं. त्यामुळे मी तो सीन केला.  त्यानंतर त्यांनी माझ्याबरोबर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. मी खूप घाबरले. मी त्यांना धक्का दिला आणि तेथून पळ काढला. सुरक्षा कर्मचाऱ्यांना समजलं की काय घडलं आहे. त्यामुळे त्यांनी मला तिथून लगेच जायला सांगितलं. 


शिल्पाने त्या निर्मात्याचे नाव उघड करण्यास नकार दिला. ती म्हणाली की , तो हिंदी चित्रपटसृष्टीतला होता. त्यानंतर मी हा सीन करायला होकार दिला कारण तो देखील एक अभिनेता होता. मी खोट बोलत नाही, पण मी त्याचे नाव घेऊ शकत नाही. कारण त्यांची मुलं माझ्यापेक्षा लहान असतील आणि जर मी त्यांचं नाव घेतलं तर त्यांना त्रास होईल. त्यानंतर मी पुन्हा त्याला भेटले. परंतु त्यांनी मला ओळखलं नसेल. त्यांनी मला एका चित्रपटात भूमिका देखील ऑफर केली होती. पण मी ती भूमिका करण्यास नकार दिला. असं शिल्पा शिंदे म्हणाली. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

हेमा समितीच्या अहवालावर चिंता व्यक्त


इंडस्ट्रीतील अनेकांना असेच अनुभव आले आहेत. मात्र, काही जण पळून गेले तर काही लोकांनी याचा सामना केला. अलीकडेच अनेक सेलिब्रिटींनी प्रसिद्ध झालेल्या हेमा समितीच्या अहवालातील निष्कर्षांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. ज्यात मल्याळम चित्रपट उद्योगात महिलांचे होणारे लैंगिक शोषण आणि कामाच्या वाईट परिस्थितीबद्दल तपशीलवार माहिती दिली आहे.