पाहा VIDEO; वाऱ्याच्या वेगानं बाईक चालवतेय ही मराठमोळी अभिनेत्री, बाजूनं गेली तर Hi नक्की करा
Solo Bike Ride : एखाद्या व्यक्तीला खूप सारं सामान लादून कुठं लांबच्या प्रवासाला निघताना पाहिलं, की आपल्याही मनात अशाच एखाद्या प्रवासाला निघण्याता मोह निर्माण होतो. या अभिनेत्रीसोबतही असंच झालं असावं.
Solo Bike Ride : तुम्हाला एखादा छंद (Hobby) आहे का? असेल तर जोपसण्यास सुरुवात करा. कारण हा छंदच तुम्हाला एक चांगली व्यक्ती म्हणून आकारास आणणार आहे. धकाधकीच्या या जीवनात आपण इतके मग्न होऊन जातो की अनेकदा स्वत:लाही विसरून जातो. पण, असं करणं अजिबातच योग्य नाही. त्यामुळं आज, आताच्या क्षणापासूनच एक निश्चय करा आणि स्वत:ला प्राधान्य द्या. यामुळं काय होईल? या प्रश्नाचं उत्तर दिलंय एका मराठमोळ्या अभिनेत्रीनं.
एरव्ही मालिकांमधून विविध भूमिका साकारणारी ही अभिनेत्री सध्या चक्क सोलो बाईक राईडला (Solo Bike Ride) जातेय. (Malshej Ghat) माळशेज म्हणू नका किंवा मग कोकणच्या (Konkan) लाल मातीत माखणं म्हणू नका. ही देखणी अभिनेत्री तिच्या रायडिंगनं अनेकांनाच थक्क करत आहे. आताआतातर तिनं व्लॉगिंगलाही (Bike Vlogs) सुरुवात केली आहे. Been There.... असं म्हणत ती नवनवीन ठिकाणं आपल्या बाईकनं गाठतेय आणि तिथं जाऊन स्वानुभवातून अनेक गोष्टी शेअर करतेय. या अभिनेत्रीचं नाव आहे, श्वेता मेहेंदळे (Shweta mehendale).
'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेमध्ये 'रेवती'च्या भूमिकेत झळकलेल्या श्वेताचं हे रुप चाहत्यांसाठी नवं असलं तरीही ते लक्षवेधी आहे. बाईकवर बसून, गरजेचं सामान सोबत घेऊन श्वेता मोठ्या उत्साहात नव्या वाटांवर निघते आणि तिचा हा प्रवास अगदी जसाच्यातसा चाहत्यांपुढे मांडते. वाटेत येणाऱ्या खाचखळग्यांपासून सर्वच अडथळ्यांपर्यंत प्रत्येक गोष्टीवर मात करत, पडत धडपत ती प्रवास करते. तिची ही Solo Bike Ride पाहताना अनेकांनाच कौतुक वाटतं (Shweta mehendale You Tube Channel).
कोकण राईडमध्ये वाईट फसली श्वेता... (Konkan Ride)
श्वेतानं नुकतीच नव्या वर्षाच्या स्वागतावेळी एक खास राईड केली. यावेळी तिच्या बाईकनं कोकणची वाट धरली होती. कोकण किनारपट्टी, लागून असणारा रस्ता, गुगल मॅपनं (Google Map) झालेली फसगत हे सर्वकाही अनुभवत श्वेतानं हा प्रवास केला. पण, यामध्ये एक वळण असं आलं, जिथं तिला तीव्र उतारावरून बाईक खाली नेताच येईना. आपण पडू की काय, बाईकचं चाक घसरेल की काय याच विचारानं ती बराच वेळ विचारात राहिली आणि पाहता पाहता अखेर तिनं तो कठीण उतारही पार केला. यानंतर तिनं व्यक्त केलेल्या भावना पाहताना पाहणाऱ्यांनाही आनंद झाला.
प्रवास करणाऱ्यांसाठी आणि नव्यानं बाईक किंवा कोणतंही वाहन शिकणाऱ्यांसाठी श्वेताचे अनुभव प्रचंड रोचक आहेत असं म्हणणं वावगं ठरणार नाही. लॉकडाऊन (Lockdown) काळात एक छंद म्हणून तिनं काही व्हिडीओ पाहिले काय, पुढे याच छंदाचं रुपांतर एका युट्यूब चॅनलमध्ये (Yout Tube channel) केलं काय.... हे सर्व पाहताना नकळतच तुम्हीही या बाईकवेड्या श्वेताच्या पाठीवर शाबासकीची थाप माराल.