मुंबई : सेन्सॉर आणि बरेच नियम या साऱ्या गोष्टी बाजूला सारत वेब सीरिजच्या माध्यमातून दिग्दर्शक, निर्माते आणि कलाकार मंडळी त्यांना हवी अगदी तशीच कलाकृती  साकारण्यासाठी बरेच प्रयोग करतात. हे प्रयोग अनेकदा प्रेक्षकांचीही दादही मिळवून जातात. असाच एक प्रयोग म्हणजे वेब सीरिज. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चौकटीबाहेरील विषय आणि ते हाताळण्यासाठी बोल्डपणा, काही बाबतीत ओलांडलेल्या मर्यादा या सर्व गोष्टी वेब सीरिजच्या माध्यमातून सहज लक्षात येतात. गेल्या काही वर्षांमध्ये उदयास आलेल्या या वेब सीरिजच्या विश्वात आता 'मिर्झापूर' नावाच्या अफलातून सीरिजची भर पडली आहे. 


'अॅमेझॉन प्राइम'ची ही सीरिज सध्या चर्चेचा विषय ठरत आहे ते म्हणजे त्यातील एका दृश्यामुळे. खरंतर या सीरिजमध्ये बोल्ड दृश्य पाहायला मिळणार हे सीरिजच्या ट्रेलरमधून लक्षात आलं होतं. आता अशीच दृश्य आणि प्रभावी कथानक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 


'मिर्झापूर'मध्ये तगड्या कलाकारांची वर्णी लागली असून, 'मसान' फेम अभिनेत्री श्वेता त्रिपाठीसुद्धा त्यात एका लक्षवेधी भूमिकेत दिसत आहे. गोलू गुप्ता हे पात्र ती यात साकारत असून, सीरिजमधून ही गोलू नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आली. 


पहिल्याच दृश्यात 'गोलू' ही एका ग्रंथालयात संभोग अर्थात सेक्सविषयी भाष्य करणारं पुस्तक वाचताना दाखवली असून, ती हस्तमैथुन करतानाही दिसते. श्वेताचं हेच दृश्य काहीजणांच्या भुवया उंचावून गेलं. 


काय म्हणाली श्वेता?


'मिर्झापूर'मधील त्या दृश्याविषयी विचारताच श्वेताने या सीरिजच्या चित्रीकरणादरम्यानच्या काही आठवणींचा संदर्भ दिला. 'महिलांनाही पुरुषांप्रमाचे काही भावना असतात आणि त्यात गैर असं काहीच नाही. ज्यावेळी मी ते दृश्य वाचलं आणि मिर्झापूरचं संपूर्ण कथानक ऐकलं तेव्हा, मी माझ्या दृश्यांकडे बोल्ड दृश्य म्हणून कधी पाहिलंच नाही. ते सारंकाही नेहमीचच होतं, अगदी कॉफी पिण्याइतकं सोपं', असं श्वेता म्हणाली. 


श्वेताचं हे उत्तर आता त्या दृश्याविषयी चर्चा करणाऱ्यांना पटतं का आणि यावर पुढे काही प्रतिक्रिया उमटतात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, हस्तमैथुनाची दृश्य साकारणाऱ्या अभिनेत्रींमध्ये  स्वरा भास्कर, नेहा धुपिया, कियारा आडवाणी यांच्यामागोमाग श्वेताच्याही नावाचा समावेश झाला आहे.