नवी दिल्ली : बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री श्रीदेवीच्या अचानक झालेल्या मृत्यूवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सुरूवातील श्रीदेवींचा मृत्यू कार्डियल अरेस्टमुळे झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र फॉरेंसिक रिपोर्टनुसार, श्रीदेवी यांचा मृत्यू पाण्यात बुडून झाल्याचे कळले. युएई मिनिस्ट्री ऑफ हेल्थने दिलेल्या रिपोर्टनुसार, श्रीदेवी यांच्या निधनाचे कारण अक्सिडेंटल ड्रोनिंग सांगितले जात आहे. त्याचबरोबर मृत्यूचे कारण हृदयविकार नसल्याचेही स्पष्ट झाले आहे.


अजब समानता


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीदेवी यांचा फॉरेंसिक रिपोर्ट येण्यापूर्वीच काही वेळ आधी अभिनेत्री सिमी ग्रेवाल यांनी ट्विट करून सांगितले की, श्रीदेवी आणि व्हिटनी हाऊस्टन यांच्या मृत्यूत काही अजब समानता आहे.



व्हिटनी हाऊस्टन ही अमेरिकेची एक प्रसिद्ध पॉप सिंगर होती. व्हिटनीचा मृत्यू ११ फेब्रुवारीला २०१२ ला बेवर्ली हिल्सच्या एका हॉटेलमध्ये झाला. ही घटना ग्रेमी पार्टीच्या काही वेळ आधी झाली. व्हिटनी यांच्या मृत्यूबद्दल लॉस एंजलिस येथून मिळालेल्या फॉरेंसिक रिपोर्टनुसार त्यांचा मृत्यू पाण्यात बुडाल्याने झाला आणि यामागे कोणतेही कटकारस्थान नव्हते. श्रीदेवी यांचा मृत्यूही व्हिटनी यांच्या मृत्यूशी साम्यता दर्शवतो.


दुबईत लग्नसोहळ्यासाठी गेल्या होत्या 


एका कौटुंबिक लग्नासाठी श्रीदेवी दुबईला गेल्या होत्या. कार्यक्रम झाल्यानंतरही त्या दुबईत एकट्याच थांबल्या होत्या. त्या राहत असलेल्या हॉटेलच्या रुममधील बाथरूममध्ये त्या बेशुद्ध अवस्थेत सापडल्या. हॉस्पिटलमध्येच नेताच त्यांना मृत घोषित करण्यात आले.