`तुला दीर्घायुष्य लाभो...`, करवा चौथसाठी सोनाक्षीचा खास लूक, सिंदूर आणि मंगळसूत्राने वेधलं लक्ष
करवा चौथ सण बॉलिवूड सेलिब्रिटी देखील मोठ्या थाटामाटात साजरा करतात. दरम्यान सोनाक्षी सिन्हाने तिचा करवा चौथचा लूक शेअर केला आहे.
Karwa Chauth 2024: देशभरात आज करवा चौथ साजरा केला जात आहे. विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात. बॉलिवूड सेलिब्रिटी देखील हा सण मोठ्या थाटामाटात साजरा करतात. अशातच आता बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने तिचा करवा चौथचा लूक उघड केला आहे. तिने पती झहीर इक्बालसोबत लग्नानंतरचा पहिला करवा चौथ साजरा करत आहे.
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने तिचा करवा चौथचा पहिला लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने लाल रंगाची साडी परिधान केली आहे. या साडीमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या फोटोंवर पती झहीर इक्बाल याने देखील सोनाक्षीला करवा चौथच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
सोनाक्षी सिन्हाचा करवा चौथ लूक
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने तिच्या इन्स्टाग्रामवर लाल रंगाच्या साडीमधील फोटो शेअर केले आहेत. फोटोंमध्ये तिने केसात सिंदूर, गळ्यात मंगळसूत्र आणि कपाळावर लाल बिंदी लावली आहे. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. यासोबत सोनाक्षीने फुल स्लीव्ह मॅचिंग ब्लाउज परिधान केला आहे. हलकासा मेकअप आणि केस खुले ठेवले आहेत. तिचा हा लुक चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.
फोटोंना दिलं हटके कॅप्शन
सोनाक्षीने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करताना एक कॅप्शन दिलं आहे. ज्यामध्ये तिने म्हटलं आहे की, मी आज आणि दररोज तुझ्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. करवा चौथच्या शुभेच्छा श्रीमान पती झहीर इक्बाल. सोनाक्षी सिन्हाच्या या पोस्टवर चाहते देखील मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. त्यासोबत चाहत्यांनी सोनाक्षीला पहिल्या करवा चौथसाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत.
सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी 7 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर यावर्षी लग्न केलं आहे. या दोघांच्या लग्नाला कुटुंबीय, जवळचे लोक आणि बॉलिवूडचे अनेक कलाकार देखील उपस्थित होते. लग्नानंतर दोघेही अनेकदा एकमेकांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात.