Sonakshi Sinha: बॉलिवूडमधील (Bollywood) दबंग गर्ल (Dabangg Girl) सोनाक्षी सिन्हा काही काळापासून मोठ्या परद्यापासून दूर आहे. बिनधास्त आणि बेधक स्वभाव ही तिची ओळख. ती सोशल मीडियावरही (Social media) फार सक्रिय नसते. तिच्या या स्वभावामुळे ती सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. यावेळी या दबंग गर्लचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल (video viral on social media) होतो आहे.  एका शोदरम्यान सोनाक्षीचं रौद्ररुप पाहिला मिळालं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


रितेश देशमुखच्या (Riteish Deshmukh) एका शोच्या दरम्यान प्रसिद्ध कॉमेडियनच्या (Famous comedy) चक्क कानाखाली लगावली आहे. 'डबल एक्सएल' (Double XL) या सिनेमाच्या प्रमोशनसाठी सोनाक्षी या शोवर आली होती. हा शो सुरु असताना कॉमेडियनने असं काही म्हटलं की, तिने कसलाही विचार न करता त्याचा कानाखाली मारली. यानंतर शोचा होस्ट रितेश देशमुखसह उपस्थितांमध्ये भयान शांतता पसरली. (Actress Sonakshi Sinha was furious on Riteish Deshmukh  Show nm)


नेमकं झालं तरी काय?


आता आम्ही सांगता की, नेमकं झालं तरी काय....अभिनेता रितेश देशमुख वेबवर नवीन शो घेऊन येतो आहे 'केस तो बनता हैं' (Case Toh Banta Hai) ...या शोचा टीझर रिलीज झाला आहे. हा शोमध्ये एक कोर्टरुमचा ड्रामा (Courtroom drama) दिसणार आहे. हा शो सुरु असताना प्रसिद्ध कॉमेडियन पारीतोश त्रिपाठी (Paritosh Tripathi) सोनाक्षी आणि सलमान खानच्या (Salman Khan ) दबंग (Dabangg) चित्रपटातील डायलॉग बोलतो. त्याशिवाय या शोदरम्यान (Show) पारितोष सोनाक्षीवर अनेक आरोप करतो. 


'थप्पड से डर नही लगना हैं तो ये ले'


शो जसाजसा पुढे जातो अचानक एका सेशनमध्ये सोनाक्षी चांगलीच संतापते आणि म्हणते बोल आता दबंगचा डायलॉग... तोही म्हणतो थप्पड से डर नही लगता हैं प्यार से लगता हैं'. त्यावर सोनाक्षी म्हणते 'थप्पड से डर नही लगना हैं तो ये ले'....


पाहा VIDEO 



सोनाक्षीचा हा अवतार पाहून सगळेच अवाक् होतात. पण हा शोचा एक भाग असतो. रितेश देशमुखचा हा नविन शो 30 सप्टेंबरला Amazon Mini Tv वर पाहिला मिळणार आहे.