मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरच्या लग्नचा चर्चा सर्वत्र सुरू आहेत. याचदरम्यान तिला बॉयफ्रेंड आनंद आहूजासोबत मुंबईतील क्लिनीकबाहेर स्पॉट करण्यात आले. यावेळी सोनमने बेबी पिंक रंगाचा कुर्ता आणि त्याला साजेशे मोठे झुकमे घातले होते. तर आनंद कॅज्युअल लूकमध्ये दिसला. सोनम आणि आनंदच्या लग्नाची तारीख ठरली असून लग्नाची तयारीही सुरु झाली आहे. स्टारडस्ट मॅगझीननुसार, सोनम आणि आनंदचे लग्न पुढच्या महिन्याच्या ६ किंवा ७ तारखेला असेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


म्हणून मुंबईत होणार लग्न


आनंद दिल्लीतील एका व्यावसायिक कुटुंबातील असल्याने मुंबईतील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये लग्नानंतर दिल्लीत ग्रॅँड रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले आहे. रिपोर्टनुसार, अनेक सेलिब्रेटींना लग्नाचे आमंत्रणपत्रिकाही पाठवण्यात आली आहे. यापूर्वी आनंद आणि सोनमचे लग्न जेनेवामध्ये होणार होते मात्र व्हेन्यू न मिळाल्याने लग्न मुंबईत प्लॅन करण्यात आले.
त्याचबरोबर पिंकविलाच्या वृत्तानुसार, सोनम आणि आनंदच्या संगीत सोहळ्याची तयारी कपूर कुटुंबाने सुरु केली आहे. यासाठी फराह खान कोरियोग्राफी करत आहे. यात अनिल कपूर पत्नी सुनीतासोबत खास परफॉर्मेंस देणार आहे.



वीरे दी वेडिंग


सोनम सध्या आपला आगामी सिनेमा वीरे दी वेडिंग मध्ये व्यस्त आहे. अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या या सिनेमाचे दिग्दर्शन शशांक घोष यांनी केले आहे. तर निर्मिती रिया कपूरने केली आहे. सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित झाले असून त्यात सोनम कपूर, करिना कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तल्सानिया मस्तीभरा अंदाजात दिसत आहेत.