मुंबई : आयुष्यात अनेक संकटं येतात तेव्हा अनेक जण आत्महत्या करण्याचा मार्ग स्वीकारतात आणि आपलं जीवन संपवतात. पण आत्महत्या हा शेवटचा उपाय असूचं शकतं नाही. 'सम्राट अशोक' फेम अभिनेत्री सौम्या सेठ देखील आत्महत्या करण्याचा विचार केला. ते सुद्धा गरोदर असताना. सौम्याने एका मुलाखतीत खासगी जीवनाबद्दल खुलासा केला. तिने आत्महत्या केली नाही करण तेव्हा ती फक्त सौम्या नव्हती तर एका बाळाची आई होणार होती. सौम्याचं बाळं आता तीन वर्षांचा आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार सौम्याने तिच्या आयुष्यातील कठीण प्रसंगांचा सामना केला, याचा खुलासा तिने मुलाखतीत केला, '2017 साली मी गरोदर होती. आई-वडिलांजवळ व्हर्जिनिया येईपर्यंत आत्महत्या करण्यासाठी मार्ग शोधण्याचा प्रयत्न करीत होते. त्यावेळी यासर्व परिस्थितीतून  मला सावरण्यासाठी माझ्या वडिलांनी माझी मदत केली.'


सौम्या पुढे म्हणाली, 'एक वेळ अशी होती मी आरश्यासमोर उभी होती, पण स्वतःला ओळखू शकत नव्हती. गरोदर होती तरीही अनेक दिवस मी काही खाल्ल नाही. काही दिवस मी आरश्यासमोर गेली सुद्धा नाही . फक्त आणि फक्त स्वतःला संपवण्याचा मार्ग शोधत होती. पण माझ्या  लक्षात आलं मी आत्महत्या केली तर माझ्या बाळाला कळणार की त्याची आई त्याच्यावर किती प्रेम करते. '


'तेव्हा फक्त माझ्यातल्या आईने मला जगवलं. तेव्हा फक्त माझ्या मुलाने माझा जीव वाचवला.'  सौम्याच्या मुलाचं नाव आयडेन आह. सौम्याने 2015 साली अमेरिकेत लग्न केलं. पण तिचं फार काळ टिकू शकलं नाही. लग्नानंतर चार वर्षात दोघे विभक्त झाले.