मुंबई : सध्या मराठी सिनेसृष्टीत सध्या लग्नसराई पाहायला मिळतेय. अनेक जोडपी आता विवाहबद्ध होत आहेत तर काहींनी आपल्या लग्नाची घोषणा केली आहे. नुकतंच पूजा सावंत - सिद्धेश चव्हाण त्याच्या प्रेमाची कबुली दिली आहे तर,  स्वानंदी टिकेकर, आशिष कुलकर्णी, यांच्या नंतर आणखी एका अभिनेत्रीने आपला साखरपुडा मोठ्या थाटामाटात उरकला आहे. अभिनेत्री आणि नृत्यांगना सुकन्या काळण हिने नुकताच साखरपुडा उरकला आहे. 'एका पेक्षा एक' या डान्स रिऍलिटी शोमधून सुकन्या घरा घरात पोहचली. गेले अनेक दिवस तिच्या रिलेशनशिपची चर्चा होती. तिच्या साखरपुड्याला  अभिनेता कुशल बद्रिकेने देखील आपल्या पत्नीसोबत हजेरी लावली होती. कुशलची पत्नी सुनैना बद्रिके हिने तिच्या सोशल मीडियावर या कार्यक्रमाचे फोटो शेअर केले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुनैना बद्रिकेने देखील सुकन्याच्या साखरपुड्याचे काही क्षण शेअर केले आहेत. सुकन्या आणि रोशन गेली अनेक वर्ष एकमेकांना डेट करत होते. या साखरपुड्यासाठी  रोशनने शेरवानी घातली होती. तर सुकन्याने लाल रंगाची शिमरी साडी परिधान केली होती.  सुकन्याने इंस्टाग्राम स्टोरीवर अनेक फोटो शेअर केले आहेत. याक्षणी सुकन्याने गुडघ्यावर बसून रोशनला अंगठी घातली. त्यांनी कपल डान्सही केला. यासोबतच त्यांच्या मित्रपरिवाराने देखील एक डान्स केला ज्यात कुशल बद्रिके आणि त्याची पत्नी सुनैनादेखील होती. 


सुकन्याने 'एका पेक्षा एक' नंतर अनेक मालिकांमधून महत्वाच्या भूमिका साकारल्या. सध्या ती 'मर्डरवाले कुलकर्णी' या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. यात ती वैभव मांगले, भार्गवी चिरमुले, निमिष कुलकर्णी यांच्यासोबत दिसतेय. आता सुकन्याचा लग्न सोहळा पाहण्यासाठी तिचे चाहते कमालीचे उत्सुक आहेत.


अष्टविनायक संस्थेच्या ‘मर्डरवाले कुलकर्णी’ या नाटकाचे लेखन जयंत उपाध्ये यांचे असून या निखळ कौटुंबिक मनोरंजक नाटकात भार्गवी चिरमुले, निमीश कुलकर्णी, सुकन्या काळण, विकास चव्हाण आणखी अनेक कलाकारांच्याही भूमिका आहेत. या नाटकाची गाणी वैभव जोशी यांनी लिहिली असून नेपथ्य संदेश बेंद्रे यांचे आहे. प्रकाश योजना रविरसिक तर संगीत आशुतोष वाघमारे यांचे आहे. संतोषची दिग्दर्शनाची अनोखी शैली आणि वैभव यांच्या अभिनयाचा हटके अंदाज ‘मर्डरवाले कुलकर्णी’ मध्ये धुमाकूळ घालत आहेत