मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी तिच्या बोल्डनेससाठी ओळखली जाते. सनीचा स्टायलिश लूक अनेकदा इंटरनेटवर व्हायरल होतो. सनी लिओनीने नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर सनीचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. सनी चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मिडियावर नेहमीच तिचे अपडेट्स शेअर करत असते. तिच्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे ती कायमच चर्चेत असते. सनीने एखादी पोस्ट सोशल मीडियावर शेअर करताच ती लगेच व्हायरल होते. अभिनेत्रीच्या पर्सनल लाईफविषयी जाणून घेण्यासाठी तिच्या चाहत्यांनाही खूप आवडतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता सनीने तिच्या चाहत्यांना एक गुडन्यूज दिली आहे. अभिनय क्षेत्रात काम करण्यासोबतच सनीने नवीन व्यवसाय सुरु केला आहे. सनीने हॉटेल इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं आहे.सनीने तिचं पहिलं हॉटेल सुरु केलं आहे. सनी तिचं पहिलं हॉटेल सुरू करताना म्हणाली, "चिका लोका " हा माझ्यासाठी नवा अनुभव असणार आहे. हॉटेल इंडस्ट्रीत पाऊल ठेवण्यासाठी मी उत्सुक तर आहेच पण हा नवा प्रवास अनुभवण्याची मी वाट बघत आहे. अभिनयाच्या सोबतीने ग्लॅमर वर्ल्डच्या पलिकडे जाऊन आता हा अनुभव घेणं नक्कीच कमालीचं असणार आहे. लोकांनी यांव इथल्या गोष्टींचा आस्वाद घ्यावा ही आमची इच्छा आहे" शेफ वैभव भार्गव यांनी तयार केलेले 7,000 स्क्वेअर फूट पसरलेले फ्लॅगशिप आउटलेट भारतीय, आशियाई, मेक्सिकन आणि इटालियन पाककृतींचे मिश्रण आहे. जागतिक फ्लेवर्सची पर्वणी इकडे अनुभवता येणार आहे. "पोशन्स बाय सनी लिओनी" हे खास बॉलीवूड कॉकटेल इकडे मिळणार आहे. 


सनीचा " चिका लोका " हा हॉटेल इंडस्ट्रीत मधला प्रवास लवकरच सुरू होणार असून स्टेज, बार आणि टेरेससह ही जागा एक नेत्रदीपक ठिकाण आहे यात शंका नाही.गोवा, हैदराबाद आणि मुंबईमध्ये विस्तार करण्याच्या योजनांसह सनीचा हा खास उपक्रम 22 जानेवारी रोजी नोएडा येथील गुलशन वन 29 येथे सुरू होणार आहे. गॅस्ट्रोनॉमी आणि मनोरंजनाच्या या नवीन युगात विविध चवींचा आणि सनीच्या मनमोहक भावनेचा प्रवास सुरू करण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत.


सनी लिओनीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर अभिनेत्री सनी अलीकडेच भोजपुरी स्टार पवन सिंगसोबत 'तेरी लाल चुनरिया'मध्ये दिसली होती. यूट्यूब चॅनलवर पवन आणि सनीच्या गाण्यांना खूप पसंती मिळाली आहे. सनी लिओनीने तिच्या करिअरची सुरुवात बिग बॉसमधून केली होती.