दोन लाखांचं कर्ज काढून IPS ची वर्दी विकत घेतली, रोज गावभर फिरायचा; नंतर कळलं आपला गेम झाला!

इतके दिवस हा तरुण आय.पी.एस ऑफीसर बनून, रस्त्यांवरुन माजात फिरत होता. खऱ्या  ऑफिसरांशी गाठभेठ झाल्यावर कळले की आपली चांगलीच फसवणूक झाली आहे. 

Sep 21, 2024, 19:21 PM IST

बिहारमध्ये एक विचित्र प्रकार घडला आहे. स्वतःला पोलीस समजणाऱ्या मुलाला, पोलिसांकडून तो अधिकारी नसल्याचे कळले. आणि ज्याला पोलीस आरोपी समजत होते तो खरा पिडीत निघाला. वाचा नक्की काय भानगड आहे. 

1/7

आय.पी.एस च्या परिक्षांमध्ये, बोगस प्रमाणपत्र आणि खोटी ओळख सांगणाऱ्या लोकांवर बरेच गुन्हे दाखल आहेत. आय.पी.एस परिक्षांच्या आणि परिक्षार्थींच्या बोगसपणाबद्दलच्या वार्ता आपण ऐकतचं असतो. पण बिहार मध्ये त्याहून वरतांड प्रकार घडला आहे.

2/7

बोगस अधिकारी

यावेळी पोलिसांनी बोगस कागदपत्रे नाही, तर अख्खा बोगस आय.पी.एस ऑफिसरच ताब्यात घेतला आहे. आश्चर्यकारक बाब म्हणजे, तो स्वतःला खरा अधिकारीच समजत होता. आरोपीला स्वतःला पोलिसांनी कानउघडणी केल्यावर, त्याच्याकडून गुन्हा घडल्याचे कळले. 

3/7

तोतया ऑफीसर

सध्या बिहारमध्ये हा तोतया आय.पी.एस ऑफीसर फार चर्चेत आहे. हा पठ्ठा अंगावर वर्दी, डोक्याला टोपी, कमरेला बंदुक अशा अवतारात,  सिकंदर चौकातील लोकांच्या नजरेस पडला. चेहऱ्यावरुन मात्र किशोरवयीन वाटत होता. चौकातील काही लोकांना मामला गडबडीचा वाटला, म्हणून त्यांनी पोलिसांना कळवले. नक्की गडबड काय आहे, ते जाणून घेण्यासाठी त्याला 'जमुई' येथून पोलिसांनी ताब्यात घेतले.       

4/7

खरा प्रकार बनवेगिरीचा

ठाण्यात आल्यावर मात्र हा कावराबावरा झालेला युवक पोपटासारखा बोलू लागला. मुलाचे नाव 'मिथिलेश कुमार' असून तो गोवर्धन बीघा गावचा रहिवासी आहे. त्याला स्वतःला तो कोणताही ऑफिसर नाही, हे पोलिसांकडून कळले. तो स्वतःला आय.पी.एस समजून रोज गणवेश घालून, बंदुक घेऊन मोटरसायकलवर ऐटीत फिरायचा. चौकशीनंतर कळले की, सारा प्रकार 'बनवेगिरी'चा आहे. आणि मिथिलेश खरा आरोपी नसून फसव्या टोळीचा शिकार झाला आहे.  

5/7

नक्की काय घडले?

मिथिलेशने पुढे सांगितले की, त्याला एका व्यक्तीने, "दोन लाख रुपये दे, तुला आय.पी.एस बनवतो" असे सांगितले. मिथिलेशने त्याला पैसे दिले मग ती व्यक्ती त्याला म्हणाली, "तो आता एक अधिकारी बनला आहे." मिथिलेश अल्पवयीन असल्याने, त्याला तो खरच ऑफिसर झाला अशी खात्री पटली.

6/7

कर्ज घेऊन पैसे जमावले

मिथिलेशकडे एवढे पैसे आले कुठून विचारल्यावर कळले की, त्याने त्याच्या मामाकडून दोन लाखाचे कर्ज मागितले. त्याच्या मामाने एवढे पैसे एका अल्पवयीन मुलाला देऊ केले. मिथिलेशने 'मनोज सिंह' असे त्या व्यक्तीचे नाव सांगितले. मनोजने मिथिलेशला सरकारी नोकरीच गाजर दाखवून बळीचा बकरा बनवलं. मनोजने त्याला बिल्ला आणि बंदूकसुद्धा दिली. 

7/7

पोलीस मनोजच्या शोधात

पोलिसांनी ताब्यात घेतले तेव्हा, मिथिलेश मनोज सिंहला अजून तीस हजार द्यायला निघाला होता. पोलीस आता या फसव्यांच्या टोळीचा  शोध घेत आहे.