मुंबई : अभिनेत्री सनी लिओनी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल सांगत असते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेहमी आनंदी आणि विनोदाच्या मूडमध्ये राहणारी सनी भावूक झाली आहे. तिने तिच्या बालपणीचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती वडिलांच्या खांद्यावर बसलेली दिसत आहे. 


सनीला पुन्हा एकदा आईच्या तोंडून तिचं नाव ऐकण्याची इच्छा आहे. सनीची ही पोस्ट सध्या खूपच व्हायरल होत आहे. सनीने तिचे बालपण कॅनडामध्ये घालवले आहे.


सनीने शेअर केलेल्या फोटोमध्ये आई-वडील आणि भाऊ तिच्यासोबत दिसत आहेत. हा फॅमिली फोटो खूपच क्यूट आहे.


फोटो शेअर करत सनीने लिहिले - "काही लोक त्यांच्यासोबत काही चुकीचे घडले की त्यांच्या पालकांना मिस करतात, पण मला प्रत्येक आनंदाच्या क्षणी आणि महत्त्वाच्या प्रसंगी आई तुझी आठवण येते."



सनीने तिच्या पोस्टमध्ये पुढे लिहिले, "14 वर्षांपूर्वी या दिवशी तू आम्हाला सोडून गेली, मला तुझी खूप आठवण येते आणि तुझी स्माईल पाहण्यासाठी मी काहीही करु शकते. मला एकदा 'गोगू' म्हणून हाक मार..लव्ह यू आई.." 


आजही सनी आईच्या तोंडू ती हाक ऐकण्यासाठी व्याकूळ झाली आहे.