मुंबई : अभिनेत्री सनी लिओन कधी काय करेल याचा नेम नाही. सगळ्यात जास्त कोणाची इंडस्ट्रीमध्ये चर्चा असेल तर ती सनी लिओनची सनीचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सनी नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. तिथे ती तिचे फोटो आणि व्हिडीओ सतत पोस्ट करत असते. नुकताच सनीचा असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे जो पाहून एका क्षणासाठी तुमचाही तोल जाऊ शकतो. व्हायरल होणारा सनीचा हा व्हिडीओ अ‍ॅनिमल' चित्रपटातील  'जमाल कुडू' या गाण्यावर आहे. या व्हिडीओत सनी डोक्यावर ग्लास घेवून नाचताना दिसत आहे. तिचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेकांनी तिच्या या व्हिडीओला पसंती दर्शवली आहे. मात्र असं असलं तरी या डान्समुळे ती ट्रोलही होत आहे. सध्या सगळीकडे सनीची या गाण्यामुळे चर्चेत आहे. सनीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल होणारा हा व्हिडीओ सनीने स्वत: तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


सध्या सगळीकडे चर्चा आहे ती म्हणजे 'अ‍ॅनिमल' चित्रपटाची. या सिनेमाने अनेक रेकॉर्ड्स मोडत इतिहास रचला आहे. हा सिनेमा तर बॉक्स ऑफिसवर हिट झालाच मात्र यासोबतच या सिनेमातील गाणीही हिट झाली. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने खूप चांगली कमाई केली. या सिनेमातील 'जमाल कुडू' हे गाणे सोशल मीडियावर चांगलीच धुमाकूळ घालत आहे. या गाण्याची चर्चा सध्या जोरदार आहे. या गाण्यातील बॉबी देओलची हुकस्टेप सध्या चर्चेचा विषय बनत आहे. अनेकजण या गाण्यावर रिल्सही क्रिएट करत आहेत.  


जमाल कुडू हे गाणं या लोकप्रिय गाण्याचं रिक्रेएट आहे.
खरंतर व्हायरल होणारं जमाल कुडू हे गाणं हे एक इराणी गाणं आहे. इराणी गाणं  'जमाल-जमालू' वरून हे गाणं प्रेरित आहे. हे इराणी गाणं हर्षवर्धन रामेश्वर यांनी रिक्रिएट केलं आहे. हे इराणी गाणं नुकताच रिलीज झालेला रणबीर कपूर आणि बॉबी देओलच्या अॅनिमलसाठी संगीतबद्ध केलं गेलं आहे. या गाण्यावर अनेकजण रिल्स रिक्रिएट करत आहेत.  बॉबी देओल स्टारर 'जमाल कुडू' या गाण्याला सहा दिवसांत YOUTUBE वर 34 मिलीयन अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. सध्या सगळीकडे फक्त हेच गाणं ऐकायला मिळत आहे. हे गाणं सध्या खूप ड्रेंण्डिंगमध्ये आहे.