मुंबई : नॅशनल अवॉर्ड विनर अभिनेत्री सुरेखा सिकरी यांचं आज निधन झालं आहे. ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा यांनी मुंबईमध्ये अखेरचा श्वास घेतला आहे. सुरेखा दीर्घकाळापासून आजारी होत्या. त्या 75 वर्षांच्या होत्या. कार्डियाक अरेस्टमुळे त्यांचं निधन झाल्याची माहिती आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2020मध्ये सुरेखा सिकरी यांना ब्रेन स्ट्रोक झाला होता. त्याचप्रमाणे 2018 मध्ये देखील त्यांना अर्धांगवायूचा झटका आल्याचीही माहिती आहे. मात्र यावर देखील सुरेखा यांनी मात केली होती.


नॅशनल पुरस्कार विजेत्या


1978 मध्ये त्यांनी ‘किस्सा कुर्सी का’ या सिनेमातू बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. मोठ्या पडद्याप्रमाणे सुरेखा सिकरी यांनी छोट्या पडद्यावरही काम केलं होतं. आयुष्मान खुरानाची सुपरहीट फिल्म 'बधाई हो' सिनेमामध्ये त्यांनी दादीची भूमिका केली होती. शिवाय त्यांना नॅशनल फिल्म पुरस्‍काराच्या मानकरी ठरल्या होत्या.


सुरेखा सिकरी यांच्या मृत्यूची माहिती त्यांच्या मॅनेजरने दिली आहे. मॅनेजरने माध्यमांना माहिती दिली की, सुरेखा आता आपल्यात नाहीत. आज सकाळी वयाच्या 75 व्या वर्षी त्यांचं निधन झालं. दुसर्‍या ब्रेन स्ट्रोकनंतर त्यांना खूप त्रास झाला होता.