मुंबई : Samantha Ruth Prabhu Naga Chaitanya Split: अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूने (Samantha Ruth Prabhu) यावर्षी पती, अभिनेता नागा चैतन्य (Naga Chaitanya) सोबत घटस्फोट घेतल्यानंतर चर्चेत आहे. सामंथा आणि नागा चैतन्य लग्नानंतर चार वर्षांनी एकमेकांपासून वेगळे झाले आहेत. एवढंच नव्हे तर या दोघांनी जॉइंट स्टेटमेंट देऊन आपल्या घटस्फोटाची बातमी चाहत्यांना सांगितली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यानंतर सामंथा सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल झाली. अनेकांनी या घटस्फोटाकरता सामंथाला जबाबदार धरलं आहे. एवढंच नव्हे तर सामंथावर अनेक आरोप देखील करण्यात आले. 


उदाहरणार्थ तिला मुलं नको होती, सामंथाचे अनेक अफेअर्स होते. तसेच सामंथा संधीसाधू होती. एवढंच नव्हे तर सामंथाने गर्भपात देखील केल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला. 



या सगळया आरोपांवर सामंथाने अतिशय धैर्याने उत्तर दिल. ती म्हणाली, मी या सगळ्या प्रकारांनी विचलित होणारी नाही. मी अजिबात तुटणार नाही. असं असलं तरीही सामंथा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 


मीडिया रिपोर्टनुसार,हल्लीच झालेल्या एका मुलाखतीत सामंथाला विचारण्यात आलं की, 2022 या सालाकडून तुला काय अपेक्षा आहे? या प्रश्नाचं उत्तर ऐकण्यास सगळेच उत्सुक होते. 


या उत्तरावर सामंथा म्हणाली की,'2021 मध्ये माझ्या खासगी आयुष्यात जे काही झालं त्यानंतर माझी काहीच अपेक्षा नाही. मी केलेला सगळा विचार विस्कटला आहे. मला काहीच अपेक्षा नाही. भविष्यात मला आयुष्यात जे मिळेल त्यासाठी मी तयार आहे. मला फक्त एवढंच माहित आहे, मला जे काही मिळेल त्यामध्ये मी सर्वोत्तम करेन.'