मुंबई : OTT चे वर्चस्व आता वाढत आहे. ओटीटीवर सर्व प्रकारचा कंटेट पाहायला मिळत आहे. ओटीटीमुळे अनेक कलाकारांचे दिवसही बदलले आहेत. मोठ्या पडद्यावर काम मिळत नसलेले कलाकार OTT मुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. रहस्यमय थ्रिलर पासून तो बोल्ड कंटेंट पर्यंत असे अनेक वेब सीरीज ओटीटीवर रिलीज होत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वी एक वेब सिरीज आली होती. 'गंदी बात 2' या वेब सीरीजमध्ये अन्वेशी जैन आणि फ्लोरा सैनी यांनी खूप बोल्ड सीन्स दिले होते. ज्यामुळे त्या खूप चर्चेत आल्या होत्या.


'गंदी बात सीझन 2' च्या या दृश्यांनी अन्वेशी जैनच्या आयुष्यात खळबळ उडवून दिली. आई-वडिलांचा फोन येताच ती भर रस्त्यात रडत घरी परतली होती. अन्वेशीचे आई-वडील तिच्याशी अनेक महिने बोलले नव्हते. याचा खुलासा अभिनेत्रीने 2020 मध्ये एका मुलाखतीत केला होता.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Anveshi Jain (@anveshi25)


अन्वेशी जैनला 'गंदी बात 2' मधील तिच्या बोल्ड सीनबद्दल तिच्या पालकांच्या प्रतिक्रियांबद्दल विचारले असता, ती म्हणाली, "ते खूप वाईट स्वप्न होते. 'गंदी बात 2' मध्ये मी कोणतेही बोल्ड सीन केले आहेत हे माझ्या आई-वडिलांपर्यंत किंवा माझ्या गावी पोहोचणार नाही, असे मला वाटत होते. पण तसं झालं नाही. पप्पांचा फोन आला तेव्हा मी जिममध्ये होते. ते फोनवर बोलले आणि मी रडायला लागले. ट्रॅफिकने भरलेल्या रस्त्यावरून मी रडत रडत घरी पोहोचले. धावत असतानाही मी रडत होते.