Urmila Nimbalkar Story : सोशल मीडियावर अनेकदा चर्चा रंगलेली असते ती म्हणजे सेलिब्रेटींची आणि त्यांच्या पोस्टची. त्यातून आता सध्या सगळीकडेच चर्चा आहे ती म्हणजे अभिनेत्री उर्मिला निंबाळकर हिची. तिच्या इन्टाग्रामवरील स्टोरीमुळे ती चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर सेलिब्रेटी हे अनेकदा आपल्या चाहत्यांनी एन्गेज ठेवण्यासाठी क्विझ किंवा आस्क मीचा फंडा वापरताना दिसतात. त्यामुळे त्याची फारच चर्चा रंगलेली असते. त्यांना चाहते नानातऱ्हेचे प्रश्न विचारले जातात. त्यामुळे त्यांची फारच चांगली चर्चा असते. कधी चाहते त्यांना त्यांच्या पर्सनल तर कधी प्रोफेशनल लाईफवर प्रश्न विचारले जातात. त्याला सेलिब्रेटीही चांगल्या प्रकारे उत्तर देताना दिसतात. त्यामुळे प्रेक्षकांचेही चांगलेच मनोरंजन होताना दिसते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या उर्मिलाच्या क्वीझनं चाहत्यांमध्ये चर्चांना उधाण आलं आहे. यावेळी उर्मिलानंही असेच क्विझ ठेवले होते. यावेळी तिलाही अनेक लोकांनी प्रश्न विचारले होते त्यामुळे तिची फारच चर्चा रंगली होती. अनेकांनी तिला तिच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफबद्दल प्रश्न विचारले होते. यावेळी तिनं सर्वच प्रश्नांना फार छान उत्तर दिलं. त्यात सगळ्यांचे लक्ष वेधले होते ते म्हणजे तिला विचारल्या गेलेल्या एका अपयशावरील प्रश्नाची. एका युझरनं तिला विचारलं की, न घाबरता घरातून बाहेर कसे पाऊल ठेवावे आणि ध्येयाचा पाठलाग कसा करावा? अपयश आल्यावर काय होईल? असे खूप नकारात्मक विचार मनात येतात. यावेळी एका नेटकऱ्यानं तिला याबद्दल सल्ला विचारला होता परंतु यावेळी तिनं यावर चांगलंच उत्तर दिलंय. 


हेही वाचा - प्रिया-उमेश सोबत दिसणाऱ्या 'या' अभिनेत्रीला ओळखलंत? 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून लावलंय सगळ्यांना वेड


ती म्हणाली की, ''जीवनात फक्त यशस्वी व्यक्तीलाच अपयश येते. जी व्यक्ती आधीच अपयशी आहे ती कधीच अपयशी होऊ शकत नाही. मला अपयश आवडतं. त्यामुळे नवीन गोष्टी करा आणि पुन्हा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करा. कारण अपयशी होण्यापेक्षा प्रयत्न न करणं ही सर्वात वाईट गोष्ट आहे.” तिच्या या उत्तरानं सगळ्यांनीच तिचे कौतुक केले आहे. 



उर्मिला मध्यंतरी विशेष कारणासाठी चर्चेत आली होती. तिचं प्रेग्नंन्सी फोटोशूट हे चांगलचं व्हायरल झालं होतं. अनेकांनी तिला तिच्या या प्रेग्नन्सी फोटोशूट प्रचंड प्रमाणात ट्रोल केलं होतं. परंतु तिनं आपल्या या शूटला घेऊनही ट्रोलर्सना उत्तर दिलं होतं तर अनेकांनी तिच्या या फोटोशूटचं कौतुकही केले होतं. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगली होती. आता उर्मिला अभिनयक्षेत्रात फार सक्रिय नसून ती आता युट्यूब चॅनल सुरू केलं आहे.