हातात गुलाबाचा गुच्छ अन् हिऱ्यांचे दागिने घालून Urvashi Rautela निघाली... Video व्हायरल
ती आपल्या सोशल मीडिया अकांऊटवरूनही नेहमीच आकर्षक आणि स्टायलिश फोटोज टाकत असते.
IUrvashi Rautela : बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाला आपल्या मोहक सौंदर्याने सगळ्यांना घायाळ करून सोडते. ती आपल्या सोशल मीडिया अकांऊटवरूनही नेहमीच आकर्षक आणि स्टायलिश फोटोज टाकत असते.
दररोज तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. आता उर्वशी रौतेलाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यात तिची ग्लॅमरस स्टाईल पाहायला मिळत आहे.
हा व्हिडिओ उर्वशीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे ज्यामध्ये तिचा किलर लूक दिसत आहे. व्हिडिओमध्ये ती वर्स्टन लूकमध्ये दिसत असून तिने हातात गुलाब घेतलेले दिसत आहे. इतकंच नाही तर तिने हिऱ्यांचे दागिने घातल्याचे पाहायला मिळत आहेत. व्हिडिओ पाहून चाहते तिच्या सौंदर्याचे कौतुक करताना दिसत आहेत.
उर्वशीने व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनही लिहिले आहे की ती मिस युनिव्हर्स बहरैनमध्ये जजिंग करणार आहे. हे सांगत तिनं आपला हा आनंद चाहत्यांसोबत शेअर केला आहे. त्याचबरोबर या व्हिडिओला अल्पावधीतच 81 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.
उर्वशी रौतेलाची फॅन फॉलोइंग खूपच जबरदस्त आहे. चाहते तिची एक झलक पाहण्यासाठी वाट पाहत असतात.
आता ती लवकरच 'द लीजेंड' या चित्रपटाद्वारे टॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. यासोबतच ती जिओ स्टुडिओच्या इन्स्पेक्टर अविनाशमध्येही दिसणार आहे आणि आता तिला पडद्यावर पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत.