मुंबई : अभिनेत्री वैदेही परशुरामी ही आज कोणाला माहिती नाही. वैदेहीचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. वैदेहीने एखादी पोस्ट शेअर करताच काही वेळातच ती पोस्ट व्हायरल व्हायला वेळ लागत नाही. सोशल मीडियावरही वैदेही कायम सक्रिय असते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी वैदेही नेहमी तिचे अपडेट्स तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकताच वैदेहीने तिच्या लहानपणीचा असा एक धक्कादायक खुलासा केला आहे. ज्यानंतर सगळ्यांनाच ते ऐकून धक्का बसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिलेल्या मुलाखतीत वैदेही तिच्या वडिलांविषयी बोलताना दिसत आहे. वैदेहीचे बाबा वकील आहेत. वडिलांना काम करताना आलेल्या अनुभवाविषयी  वैदेही म्हणाली, "माझ्या वडिलांनी जेव्हा प्रॅक्टीस सुरु केली तेव्हा सुदैवाने त्यांना खुप चांगले सिनीयर्स मिळाले. आपल्याला जे काम येतं,  जी केस येते त्याचा परिणाम स्वतःवर होऊन द्यायचा नाही हे त्यांनी ठरवलं. आम्ही लहान असताना त्यांनी अशाही केस घेतल्या ज्यामुळे घरात अशांतता पसरली होती. एक - दोनदा असंही झालं की लँडलाईनवर धमक्यांचे फोन आले. तेव्हा आम्ही लहान होतो. आई अर्थात घाबरली होती. तेव्हा वडिलांनी ठरवलं की, हे घरापर्यंत येतंय. त्यामुळे अशा केसेस नाही घेतल्या तर आपल्या आयुष्यात असा काही फरक नाही पडणार आहे. त्यामुळे त्यांनी कामाच्या बाबतीत एक मर्यादा ठेवली." असं वैदेही म्हणाली. वैदेहीने 'वायफळ' या युट्यूबचॅनलला दिलेल्या पॉडकास्ट मुलाखतीत तिच्या लहानपणीचा हा किस्सा शेअर केला आहे. 


वैदेहीच्या वक्तव्यानंतर हे ऐकून अनेकांना धक्का बसत आहे. सध्या वैदेही मराठीतील आघाडीची अभिनेत्री आहे. वैदेही अभिनेत्री असण्यासोबतच एक कथ्थक नृत्यांगना आहे. तिने इस्कॉन, नृत्यांजली, चिल्ड्रन क्लब, मराठा मंदिर, शारदा संगीत विद्यालय इत्यादींनी आयोजित केलेल्या कथ्थक स्पर्धा जिंकल्या आहेत. 


वैदेहीने आपल्या करिअरची सुरुवात टीव्हीपासून केली.  2010 मध्ये आलेल्या 'वेड लावी जिवा' या मालिकेतून वैदेही घरा-घरात पोहचली. २०१२ मध्ये तिने 'मिस क्लीन एंड क्लियर'चा किताब जिंकला आणि  यानंतर सलग दोन वर्ष ती त्यांची ब्रँण्ड एम्बेसेडर बनली. २०१६ मध्ये तिने अमिताभसोबत 'वजिर'सिनेमात छोटीशी भूमिका साकारली होती. वैदेही शेवटची 'जग्गु आणि ज्युलिएट' सिनेमात झळकली होती. वैदेहीचा सोशल मीडियावर खूप चाहता वर्ग आहे. सोशल मीडियावर वैदेही तिचे कायम व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असते.