मुंबई : साऊथची अभिनेत्री विजयलक्ष्मीने मानसिक तणावाखाली आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र यामध्ये ती वाचली असून तिला रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आत्महत्या करण्यापूर्वी विजयलक्ष्मीने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलं होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या अगोदरही तिने असे अनेक व्हिडिओ शेअर केलेत. ज्यामध्ये तिला सोशल मीडियावर अधिक प्रमाणात बुली केलं जात असून याचा ताण आपल्यावर असल्याचं म्हटलं आहे. यामध्येच रविवारी तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती ब्लड प्रेशरची औषध खातं आहे. या औषधांमुळे तिचं ब्लड प्रेशर कमी होऊन तिचा मृत्यू होईल, असं तिला वाटतं आहे. 


सध्या तिच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तिने फेसबुकवर एक व्हिडिओ पोस्ट केला. ज्यामध्ये तिने म्हटलंय, हा माझा शेवटचा व्हिडिओ आहे. गेल्या चार महिन्यांपासून मी सीमान आणि त्यांच्या पार्टीत असलेल्या लोकांमुळे खूप तणावात आहे. मी माझ्या कुटुंबासाठी जगण्याचा प्रयत्न केला. पण मला ते शक्य होत नाही. मला हरी नादरने मीडियासमोर खूप अपमानित केलं आहे. मी ब्लड प्रेशरची औषधं खाल्ली आहेत. काही वेळातच माझा मृत्यू होईल.



विजयलक्ष्मीने या व्हिडिओत म्हटलंय की, तिचा मृत्यू हे एक उदाहरण व्हायला हवं. सीमान आणि हरी नादर सारख्या लोकांच्या नादी लागू नका. मानसिक शोषण केल्याप्रकरणी त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी. 


मिळालेल्या माहितीनुसार, विजयलक्ष्मी यांना चेन्नईच्या एका खासगी रुग्णालयात दाखल केलं आहे. विजयलक्ष्मीने आरोप केलेला सीमान हा एक तमिळ नॅशनलिस्ट पार्टीचा प्रमुख असून हरी नादर देखील राजकीय ओळख ठेवतो.