मुंबई : बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांना दुसऱ्या अभिनेत्रींच्या पतीला डेट करण्याची इच्छा आहे. महत्त्वाचं म्हणजे या अभिनेत्री त्यांच्या मनात असलेली इच्छा उघडपणे बोलून देखील दाखवतात. अशीचं एक अभिनेत्री म्हणजे भूमी पेडणेकर. एका मुलाखतीदरम्यान भूमीला डेटींगबद्दल विविध प्रश्न विचारण्यात आले. विचारण्यात आलेल्या प्रश्नांवर भूमीने बेधडकपणे उत्तर दिली. तिने या मुलाखतीच्या माध्यमातून सर्व इच्छा व्यक्त केल्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुलाखती दरम्यान तिला विचारण्यात आली की तुला बॉलिवूडमधील कोणत्या अभिनेत्रीच्या पतीला डेट करायला आवडेल. या प्रश्नावर भूमी म्हणाली 'मला अभिनेत्री अनुष्का शर्माचा पती आणि क्रिकेटर विराट कोहलीला डेट करायला आवडेल. त्यानंतर मला अभिनेत्री प्रियंका चोप्राचा पती आणि गायक निक जोनसला डेट करायला आवडेल.'



पुढे भूमी म्हणाली, 'निक जोनस फार छान आहे. मी लहानपणापासून त्यांचे गाणे ऐकते. निक प्रचंड क्यूट आहे.' सध्या भूमीचं हे वक्तव्य तुफान चर्चेत आहे. शिवाय भूमी कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. 


भूमीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, भूमी 'दुर्गामती' चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आली. कोरोना महामारीमुळे चित्रपट रूपेरी पडद्यावर प्रदर्शित होवू शकला नाही. 'दुर्गामती' चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला. याशिवाय भूमी 'मिस्टर लेले', 'बधाई दो' चित्रपटांमध्ये दिसणार आहे.