नवी दिल्ली : बॉलिवूडमध्ये एक वेळ कॅटरीना कैफ (Kaitrina Kaif ) नावाची एकतर्फी चलती असायची. त्यावेळी झरीन खान (Zareen Khan)ने सलमान खान (Salman Khan)च्या 'वीर' सिनेमातून बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवलं. तेव्हापासून झरीन खानची तुलना कॅटरीना कैफसोबत केली जायची. दरम्यान झरीन खानने कॅटरीनाला उद्देशून एक धक्कादायक विधान केलंय. हे विधान ऐकून सलमान खानला देखील धक्का बसू शकतो. झरीनने आपलं करीयर धोक्यात आल्याचा ठपका कॅटरीन कैफवर ठेवलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


तुलना वेदनादायक


नुकत्याच झालेल्या मीडिया मुलाखतीत झरीन खानने तिच्या करियर संदर्भात महत्वाचे विधान केलंय. जेव्हा मी बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं तेव्हा माझी तुलना कॅटरीनासोबत केली गेली. हे खूप वेदनादायी असायचं असे ती म्हणाली. पण मी हार मानली नाही. याआधी देखील इंडस्ट्रीमध्ये असं झालंय. प्रीती झिंटाची तुलना अमृता सिंहशी आणि अमिषा पटेलची तुलना नीलमसोबत केली जायची. 



सुरुवातीचा काळ माझ्या करियरसाठी खूप कठीण असायचा. जेव्हा 'वीर' चालला नाही तेव्हा मलाच जबाबदार धरण्यात आलं. मला कोणीच समजू शकले नाही. मी लोकांसाठी एक सॉफ्ट टार्गेट बनली असे झरीन म्हणाली.


काम मिळणं कठीण


पहील्या सिनेमानंतर मला काम मिळणं कठीण झालं होतं. कॅटरीना कैफप्रमाणे लूक असल्याचा तोटा मला करियमध्ये झाल्याचे ती म्हणाली. कोणताही सिनेनिर्माता डुप्लीकेटसोबत काम करत नाही असेही ती पुढे म्हणाली.