Zeenat Aman Bold Photos: ज्येष्ठ अभिनेत्री झिनत अमान या आपल्या हटके स्टाईल आणि सौंदर्यासाठी ओळखल्या जातात. आज वयाच्या 72 व्या वर्षीही त्या तितक्याच बोल्ड आणि ब्युटीफूल (Zeenat Aman Instagram) दिसतात. त्यांचेही असंख्य चाहते आहेत. त्यामुळे त्यांच्या सौंदर्याची आजही चर्चा होताना दिसते. काही दिवसांपुर्वीच त्या सोशल मीडियावरही सक्रिय झाल्या आहेत. इन्टाग्रामवरही त्यांचे असख्य फॉलोवर्स आहेत. त्यामुळे त्याही अनेकदा आपले स्टाईलिश फोटोशुट सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. त्यांच्या या फोटोंना त्यांच्या चाहत्यांकडून चांगल्या प्रतिक्रिया येताना दिसतात. त्यांचे फोटोही सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतात. सध्या त्यांनी असेच एक लेटेस्ट फोटोशूट दिले आहे. ज्यात त्या अत्यंत स्टायलिश आणि सुरेश दिसत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

70 आणि 80 च्या दशकात झिनत अमान या प्रचंड लोकप्रय होत्या. त्या काळातही त्यांचा चाहतावर्ग प्रचंड होता. आजही त्यांच्या चाहत्यांमध्ये जराही कसुर पडलेली नाही. आज बॉलिवूड चित्रपटांमध्ये बोल्डनेसची चर्चा केली जाते. परंतु त्या काळी झिनत अमान यांनी एक काळ रंगवला होता. त्यांनीही अनेकदा बोल्ड फोटोशूट (Bold Photoshoot) केलं आहे. त्याकाळी सत्यम शिवम सुंदरम या त्यांच्या चित्रपटामध्ये त्यांनी ट्रान्सपरंट साडीमध्ये आपल्या बोल्ड अदाकारींनी चाहत्यांना घायाळ केले होते. आज वयोपरत्वे त्यांच्या चेहऱ्यावर सुरकूत्या दिसत असल्या किंवा त्यांचे केस हे पांढरे झाले असले तरी त्यांच्यात सौंदर्यात कुठेही कमी पडलेली नाही. 


हेही वाचा - Pushpa 2 मधील कलाकारांच्या बसचा अपघात, शुटिंगहून परतताना बसला धडक


काही दिवसांपुर्वी त्यांनी ब्लॅक ड्रेसमधलं आपलं बोल्ड फोटोशूट केलं होतं. त्यांनी त्यावर गोल्डन ज्वेलरी परिधान केली होती आणि त्यांनी त्यावर सनग्लासेस लावले होते. त्यामुळे त्यांच्या या लुकची प्रचंड चर्चाही झाली होती. यावेळी त्यांनी अजून एक फोटोशूट करत सोशल मीडियावर पुरता कहर केला आहे. यावेळी त्यांनी मिडी ड्रेस परिधान केली आहे आणि त्यामध्ये हाय नेकलाईन होती आणि टेक्सचर्ड प्रिंटही होतं. यावर ड्रॉ शोल्डर स्लिव्स होत्या. या ब्लॅक ड्रेसवर एक लाल पट्टीही होती. यावर त्यांनी व्हाईट पर्लचा नेकलेस घातला होता. आणि आपला लुक सनग्लासेसनं पुर्ण केला आहे. यावेळी त्यांनी स्टॉकिंग्स आणि त्याखाली शूज घातले आहेत. 



त्यांच्या या लुकवर चाहते अक्षरक्ष: फिदा झाले आहेत. त्यांच्या लुकवर चाहत्यांनी सकारात्मक कमेंट्स केल्या आहेत. बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींनाही त्यांच्या या फोटोशूटला लाईक केले आहे तर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत. सोबतच त्यांनी त्यांच्या सौंदर्याचे अप्रिसिएशनही केले आहेत.