अभिनेत्री आत्महत्या प्रकरणाला नवं वळण, वडिलांची अभिनेत्याविरुद्ध तक्रार
छोट्या पडद्यावरील सुप्रसिद्ध कन्नड अभिनेत्री सौजन्याच्या आत्महत्या प्रकरणाने नवीन वळण घेतले आहे,
बंगळुरु : छोट्या पडद्यावरील सुप्रसिद्ध कन्नड अभिनेत्री सौजन्याच्या आत्महत्या प्रकरणाने नवीन वळण घेतले आहे, अभिनेत्रीच्या वडिलांनी तिचा सहकारी अभिनेता विवेक आणि सहाय्यक महेश यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाचा तपास करणारे पोलीस कन्नड आणि तेलुगू छोट्या पडद्यावरील अभिनेते विवेक आणि महेश यांची चौकशी करत आहे. अभिनेत्रीच्या वडिलांनी आरोप केला की, त्यांना संशय आहे की विवेक आपल्या मुलीशी लग्न करण्यासाठी तिच्यावर अत्याचार करत होता.
अभिनेत्रीचे वडील म्हणाले की, माझी मुलगी व्यवस्थित होती. मी तिला नुकतेच पैसे दिले होते. तिचे सोन्याचे दागिनेही गायब आहेत. महेशने पोलीस येण्याची वाटही बघितली नाही आणि त्यांनी माझ्या मुलीचा मृतदेह ज्या ठिकाणी आत्महत्या केली त्या ठिकाणाहून काढला. सौजन्याचा मोबाईल गायब आहे. एकदा तो सापडला की सर्वकाही बाहेर येईल. दरम्यान, पोलिसांनी आई-वडिलांच्या उपस्थितीत अपार्टमेंटची तपासणी केली. शवविच्छेदनानंतर त्याचा मृतदेह पालकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
आरोपांवर प्रतिक्रिया व्यक्त करताना अभिनेता विवेक म्हणाला की, त्याच्यावरील आरोपांना उत्तर देण्यासाठी तो पोस्टमार्टम अहवालाची वाट पाहत आहे. तो म्हणाला की, मी आता काही बोलणार नाही. मी सौजन्याला एक वर्षाहून अधिक काळ ओळखत होतो. ती जेव्हा कधी अस्वस्थ व्हायचो, तेव्हा ती मला भेटायची. कर्नाटकचे गृहमंत्री अरागा ज्ञानेंद्र यांनी म्हटले आहे की त्यांनी पोलिसांना या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
सोजन्याने तिच्या सुसाईड नोटमद्ये म्हटलं की, तिची मानसिक स्थिती चांगली नाही आणि ती आता सहन करू शकत नाही. मात्र, आत्महत्येमागील नेमके कारण काय आहे याबाबत पोलिसांनी अद्याप काहीही सांगितलेले नाही.