Adah Sharma Marathi Poem : बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्मा ही तिच्या द केरला स्टोरी या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात अदानं शालिनी ही भूमिका साकारली आहे. अदा ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतात. नुकतेच अदाचे काही जुने व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. अदाचं आणि मराठीचं एक खास नातं आहे. हे तुम्हाला माहितीये का? अदाचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओत अदा मराठी कविता बोलताना दिसत आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अदानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे व्हिडीओ शेअर केले आहेत. अदानं या व्हिडीओत तिनं लहानपणी ऐकलेल्या दोन मराठी कविता गायल्या आहेत. या व्हिडीओत अदा आधी 'एक होती इडली, ती होती चिडली' आणि त्यानंतर अदा 'अटक मटक चवळी चटक' हे गाणं बोलताना दिसते. अदानं पहिल्या व्हिडीओत 'एक होती इडली, ती होती चिडली' हे गाणं गायलं. तिच्या या व्हिडीओतील तिचा उच्चार पाहता सगळ्यांना आश्चर्य झाले होते. त्यानिमित्तानं तिचं कौतुक केलं होतं. दुसऱ्या व्हिडीओत अदा 'अटक मटक चवळी चटक' हे गाणं बोलताना दिसते. हे गाणं अदानं गुढी पाढव्याच्या शुभेच्छा देत शेअर केला होता. अदाचे हे दोन्ही व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. तिचे हे व्हिडीओ पाहता अनेक नेटकऱ्यांना त्यांच्या लहानपणीची आठवण आली.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


अदाचे हे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्यावर मजेशीर कमेंट केल्या आहेत. एक नेटकरी म्हणाला, 'अदा मॅम तुम्हाला किती भाषा येतात.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'खूप छान मराठी अदा मॅम एक मराठी चित्रपट होऊन जाऊदे आता.' यावर उत्तर देत अदा म्हणाली, 'मी स्वत: वाट बघत आहे.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'मराठी कुठे शिकलीस गं....ती पण एवढी भारी ? त्यावर अदानं त्या नेटकऱ्यांला उत्तर देत शाळेत शिकली असं म्हटलं आहे.' एक नेटकरी म्हणाला, 'अदा की अदा खूपचं भारी.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'चला हवा हेऊ द्या मध्ये या खूप मजा येईल तुम्हाला तिथे बघायला.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'मराठी पण मस्त,तू पण मस्त, इडली पण मस्त,विडिओ पण मस्त'


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


हेही वाचा : The Kerala Story collection Day 9: 'द केरला स्टोरी'नं बॉक्स ऑफिसवर केला 100 कोटींचा आकडा पार


दरम्यान, अदाचं खरं नाव काय आहे तुम्हाला माहितीये का? अदानं पावनी मल्होत्रा या युट्यूबरला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की तिचं खरं नाव 'चामंडेश्वरी अय्यर आहे. ते उच्चारणं कठीण असल्यानं अभिनय क्षेत्रात येण्याआधी तिनं तिचं नाव अदा ठेवलं.