आदेश बांदेकर यांना अश्रू अनावर; नेमकं कारण काय पाहा व्हिडीओ
झी मराठीवरील होम मिनिस्टर कार्यक्रमाला १९ वर्ष पुर्ण झाली आहेत. या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं आहे. या कार्यक्रमाद्वारे ते महाराष्ट्रभर फिरत असतात. सगळ्यांचे लाडके भावोजी आजवर महाराष्ट्रातील प्रत्येक घरा घरात प्रसिद्ध आहेत.
मुंबई : झी मराठीवरील होम मिनिस्टर कार्यक्रमाला १९ वर्ष पुर्ण झाली आहेत. या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं आहे. या कार्यक्रमाद्वारे ते महाराष्ट्रभर फिरत असतात. सगळ्यांचे लाडके भावोजी आजवर महाराष्ट्रातील प्रत्येक घरा घरात प्रसिद्ध आहेत. इतकंच नव्हे तर आपल्या लाडक्या भावोजींनी घरी यावं असं प्रत्येकीला वाटतं. आदेश बांदेकर मराठी मनोरंजन आघाडीचे अभिनेते म्हणून ओळखले जातात. 'होम मिनिस्टर' या कार्यक्रमामुळे ते घराघरांत लोकप्रिय झाले. अलीकडेच या कार्यक्रमाने तब्बल १९ व्या वर्षात पदार्पण केलं आहे. यानिमित्ताने महाराष्ट्राच्या लाडक्या भावोजींनी गेल्या काही दिवसांत अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली. काही दिवसांपुर्वी त्यांनी झी मराठी वाहिनीवरील सारेगमप या कार्यक्रामाला हजेरी लावली होती.
यावेळी त्यांच्या आठवणींना उजाळा देत एक व्हिडीओ प्ले करण्यात आला. यासोबतच त्यांच्यासोबत काम करण्यारा अनेकांनी त्यांच्याविषयीच्या भावना व आठवणींना उजाळा दिला. या सगळ्यांच्या भावना ऐकून मात्र आदेश भावोजी भावूक झाले. त्यांना अश्रू अनावर झाले. भावूक होत आदेश बांदेकर म्हणाले, 'ईमोशनल झालो अशासाठी कारण या सगळ्यांची जी भावना होती. हे २४ तास माझ्यासोबत असतात. मी दिसतो. धन्यवाद सारेगमपच्या मंचाचे आणि झी मराठीचे की, खरी टीम जी माझ्या मागे शक्ती म्हणून उभी आहे ती आज या मंचावरुन आज सर्वांना दिसली. कारण ते कुटूंब आहे. कार्यक्रम कुटूंबाचा आहे. आणि आम्ही जेव्हा कुटूंबात जातो तेव्हा हे सगळं कुटूंब झालेलं आहे. या प्रवासामध्ये मी जसा असतो तसा हे सगळे सोबत असतात.
ज्या दिवशी माझ्यावर दुधीचा अटॅक झाला. तेव्हा कर्जतला निघालेलो होतो. दुधीचा ज्यूस प्यायल्याने एका तासात मला प्रचंड त्रास सुरु झाला. डॉक्टरांनी माझ्या जगण्याची आशाही सोडली होती. खांद्यावर बाळाला जसं उचलून नेतात तसं कुमारच मला उचलून हॉस्पिटलला गेला होता. मला म्हणायचं आहे की, मी त्यांच्यासाठी काही केलेलं नाही. त्यांनीच माझ्यासाठी एवढं केलेलं आहे कदाचित त्यांची सगळ्यांची विलपॉवर म्हणून १९ वर्ष महाराष्ट्राच्या घरा-घरात जाऊन आनंद देण्याचं काम या कार्यक्रमाने केलेलं आहे. हे सगळं झी मराठीमुळे आहे. मी कोणीही नाही. आणि मला असं वाटतं आणि हे सगळे आई-वडिलांचे संस्कार आहेत आणि सुचित्रा सोहमने प्रचंड दाखवलेला विश्वास आहे. आणि या महाराष्ट्राच्या तमाम घरांनी आदेशसाठी सताड २४ तास घराचा दरवाजा उघडा केला आणि आशिर्वाद दिला म्हणून न थांबता प्रवास सुरु झाला' हे बोलत असताना मात्र त्यांचे डोळे पाणावले होते. स्वत: आदेश बांदेकर यांनी त्यांच्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. चाहत्यांकडून या व्हिडिओवर लाईक्स कमेंट्सचा वर्षाव होत आहे.