BF शी लग्न करण्याआधी राखीचा मोठा खुलासा, `तर तुझ्या बहिणीचं....`
राखी सावंतमुळे आदिलच्या कुटुंबात अडथळे? स्वत: राखीने सांगितली कहाणी
मुंबई : ड्रामा क्वीन राखी सावंत कधी आपल्या स्टाईलने तर कधी बोल्डनेसमुळे नेहमी चर्चेत असते. तर कधी तिच्या वक्तव्यांमुळेही चर्चेत आली आहे. आता राखीचा भावुक करणारा एक अनुभव तिने चाहत्यांसोबत शेअर केला आहे. तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
खरंतर, एकीकडे आदिल दुर्रानी आणि राखीच्या लग्नाची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहेत. पण त्यांच्या लग्नाआधी मोठं विघ्न आलं आहे. राखी आणि आदिलच्या लग्नाच्या चर्चांमुळे आता त्याच्या बहिणीचं लग्न जमत नसल्याचा खुलासा स्वत: राखीने केला.
लग्नाच्या प्रश्नावर राखी उदास
एका मुलाखतीत राखी सावंतने पाणवलेल्या डोळ्यांनी याबाबत खुलासा केला. तिच्यामुळे आदिलच्या बहिणीच्या लग्नात अडथळे येत आहेत. मुलाखतीमध्ये जेव्हा राखीला प्रश्न केला तेव्हा अभिनेत्री उदास झाली. आदिलच्या घरची सून झाली तर त्याच्या बहिणीचं लग्न होऊ शकत नाही असं राखीने यावेळी सांगितलं.
अभिनेत्री म्हणाली, "बॉलिवुडमध्ये किती मुस्लीम आहेत...त्याचं लग्न नाही झालं का? सगळ्या मुलींनी एक्सपोज केलं नाही का? मुस्लीम मुली आयटम साँग करत नाहीत का? असा प्रश्नही राखीने उपस्थित केला आहे.
होत नाहीये बहिणीचं लग्न
इतकंच नाही तर राखी सावंत भावुक होऊन त्याला विचारते, ती आंतकवादी आहे का? राखी म्हणते, ''त्याच्या बहिणीचं आता लग्न होणार आहे. आता घरचे मुलगा शोधतायेत, पण असे काही लोकं म्हणतात की, अरे, तू जर राखी सावंतला तुझी पत्नी म्हणून आणलंस तर तुझ्या बहिणीशी लग्न कोण करणार? हे काय आहे? मी आतंकवादी आहे का? मी लग्न का करू शकत नाही? लग्नाच्या गाठी वर बाधल्या जातात असं म्हणतात ना?
राखी सावंतचं लग्न
राखी सावंत सध्या आदिल दुर्रानीसोबतच्या नात्यामुळे चर्चेत आहे. आदिलच्या आधी राखी सावंतने 2019 मध्ये रितेश नावाच्या एका बिझनेसमनशी लग्न केलं होतं. मात्र, दोघंही वेगळे झाले. आदिलबद्दल सांगायचं झालं तर तो म्हैसूरचा रहिवासी असून तो बिझनेसमन आहे.