राखी सावंतच्या `तसल्या` कपड्यांवर बॉयफ्रेंड आदिल संतापला, अभिनेत्रीला वाटते भीती?
राखीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे.
मुंबई : बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) ही कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. राखीच्या आयुष्यात बिझनेसमन आदिल खान दुर्रानी आल्यापासून तिचे जग बदलून गेले आहे. तिचा पेहरावही बदलला आहे. राखीनं सांगितलं की आदिल आणि तिच्या कुटुंबाला ग्लॅमरस कपडे घालणे आवडत नाही. त्यामुळे त्याने अंग झाकतील असे कपडे परिधान करण्यास सांगितले आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्या दोघांनी कपड्यांसंबंधीत प्रश्नावर उत्तर दिलं आहे.
आणखी वाचा : Miyan Biwi Aur Banana: शॉर्ट फिल्म निर्मात्यांविरोधात तक्रार दाखल, भगवान जगन्नाथांवर विनोद केल्याचा आरोप
राखी आणि आदिलचं 'तू मेरे दिल में रहने के लायक नहीं' हे गाणं प्रदर्शित झालं आहे. त्या निमित्तानं दोघांनी पत्रकार परिषद घेतली तेव्हा पत्रकरांना आदिलला राखीच्या कपड्यांबद्दल अनेक प्रश्न विचारले. यावर राखी आधी म्हणाली की गाण्याच्या शूटिंगसाठी तिच्या घरी कपड्यांनी भरलेल्या तीन बॅग आल्या होत्या. त्यातून जे सिलेक्ट करण्यात आले तेच कपडे मी परिधान केले. बाकी कपड्यांसाठी नकार मिळाला कारण ते ग्लॅमरस होते. शरीर दाखवण्याची अजिबात परवानगी नाही. अनेक बंधने आहेत. मी फाटलेले गाऊन अजिबात परिधान करू शकत नाही. आपण बॉलिवूडमध्ये आहोत, एवढं चालतं असं मी त्याला सांगितलं, पण आदिलनं स्पष्ट नकार दिला.'
आणखी वाचा : वैवाहिक आयुष्यात दोनवेळा अपयश तरी..., श्वेता तिवारी लेकीला; म्हणाली 'तू हेच कर...'
आदिल म्हणाला की, चांगले कपडे परिधान केल्यानं राखी सावंतमध्ये बदल होणार नाही. राखी सावंत राखी सावंतच राहणार. ती काय करते? तिने काय परिधान केलं आहे. त्यानं काही बदलणार नाही. दुसरीकडे राखीनं सांगितलं की, आदिल आल्यापासून तिच्या आयुष्यात आनंद आला आहे. 'त्यानं माझ्या कपड्यांमध्ये बरेच बदल केले आहेत. लोकही त्याच्यावर खूप खुश आहेत. पण जेव्हा मी कपडे खरेदी करण्यासाठी जाते आणि मी कोणत्या मुलीला शॉर्ट ड्रेसमध्ये पाहते तेव्हा मला वाईट वाटतं आणि मी रडते.
कपडे घालण्याची निवड इतरांची नसून स्वतःची असावी, मग राखीवर बंदी का? या प्रश्नावर आदिल म्हणतो, 'कपडे सौंदर्य वाढवतात, यात शंका नाही. पण माझा मुस्लिम धर्म आहे. मी राखीसोबत आहे याचा अर्थ मी सगळं सोडून या इंडस्ट्रीचा भाग झालो असं नाही. पूर्वी राखीचे कपडे चांगले नसायचे कारण ते रीव्हिलिंग असायचे. राखीला हिजाब आणि बुरख्यात रहावे लागेल असे मी म्हणत नाही. राखीला असे कपडे घालायचे होते, म्हणून मी तिला ते न घालण्याची सक्ती केली नाही आणि बंदी लावली नाही. मी फक्त तिला समजावून सांगितले आणि तिला देखील त्या गोष्टी आवडल्या.
आणखी वाचा : इच्छेविरुद्ध लग्न करण्यासाठी पालकांचा दबाव? 'या' प्रसिद्ध सेलिब्रिटीच्या मूलीनं संपवलं जीवन
यावर राखीनं सांगितले की, आदिल जे म्हणाला ते तिनं ऐकलं कारण तिला त्याला गमवायचे नाही. तिला तिच्या आयुष्यात आदिल हवा आहे. त्यांची जोडी टिकावी अशी तिची इच्छा आहे. ती आदिल आणि त्याच्या कुटुंबाचे मन दुखवू शकत नाही. त्यामुळे त्याने स्वत:ला बदलण्याचा निर्णय घेतला. कपड्यांमध्ये काय फरक पडतो? ती राखी राहील.