वैवाहिक आयुष्यात दोनवेळा अपयश तरी..., श्वेता तिवारी लेकीला; म्हणाली 'तू हेच कर...'

पलक तिवारी ही श्वेता तिवारीची मोठी लेक आहे. 

Updated: Sep 11, 2022, 05:16 PM IST
वैवाहिक आयुष्यात दोनवेळा अपयश तरी..., श्वेता तिवारी लेकीला; म्हणाली 'तू हेच कर...' title=

मुंबई : छोट्या पडद्यावरील अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. श्वेता ही सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. खरंतर श्वेता आणि तिची लेक पलक तिवारी (Palak Tiwari) या दोघांचे लाखो चाहते आहेत. श्वेता आणि पलकला एकत्र पाहिलं की पलक ही श्वेताची लेक नाही तर लहान बहिण वाटते. श्वेता ही नेहमीच तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यावेळी सगळ्यांसमोर बोलताना दिसते. दरम्यान, एका मुलाखतीत श्वेतानं खुलासा केला की तिचा लग्नावर विश्वास नाही. एवढंच काय तर तिनं लेक पलकला लग्न न करण्याचा सल्ला दिला आहे. 

आणखी वाचा : कियारा नाही तर सिद्धार्थला लागले नोराच्या सौंदर्याचे वेड, पाहा काय करतोय अभिनेता

श्वेतानं टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, 'हे माझ्या मुलीचे आयुष्य आहे आणि तिला ते कसे जगायचे आहे हे मी ठरवत नाही. पण तिनं कोणतेही पाऊल उचलण्यापूर्वी नीट विचार करावा असं मला वाटतं. फक्त तुम्ही रिलेशनशिपमध्ये आहात, असं काही नाही. त्या रिलेशनशिपनंतर लग्न करणे आवश्यक आहे. आयुष्यात लग्न होणं खूप महत्वाचे आहे आणि लग्नाशिवाय आयुष्य कसे जाईल, असे होऊ नये.' 

आणखी वाचा : मोठ्या बजेटचे चित्रपट करुणही मिळाली नाही ओळख..., त्यानंतर अभिनेत्रीला प्रसिद्धीसाठी पाच अभिनेत्यांसोबत करावं लागलं असं काम?

पुढे श्वेता म्हणाली, 'मला सांगायचं आहे की प्रत्येक लग्न वाईट नसतं. माझे अनेक मित्र आहेत ज्यांचे वैवाहिक जीवन आनंदी आहे आणि मी त्यांच्यासाठी आनंदी आहे. पण मी असे अनेक मित्र पाहिलेत जे त्यांच्या वैवाहीक आयुष्यात कॉम्प्रोमाइज करतात. जे योग्य नाही. ते त्यांच्यां मुलांसाठी योग्य नाही.'

आणखी वाचा : इच्छेविरुद्ध लग्न करण्यासाठी पालकांचा दबाव? 'या' प्रसिद्ध सेलिब्रिटीच्या मूलीनं संपवलं जीवन

पुढे श्वेता म्हणाली, 'मला माझ्या मुलीला सांगायचे आहे की तुला ज्या गोष्टीतून आनंद मिळेल ते कर. पण समाजाच्या दबावाखाली काही करू नकोस. तू संधी सोडू शकत नाहीस. कारण जे योग्य नाही ते नंतरही योग्य होणार नाही.' (shweta tiwari after two failed marriages gave advice to daughter palak tiwari not to get married )

आणखी वाचा : सुष्मिता सेन- ललित मोदींच्या रिलेशनशिपवर कपिल शर्मा म्हणाला..., एकदा वाचा

श्वेताचे पहिले लग्न 1998 मध्ये राजा चौधरीसोबत झाले होते,  2012 मध्ये ते घटस्फोट घेत विभक्त झाले. त्या दोघांना एक मुलगी असून पलक असे तिचे नाव आहे. राजापासून घटस्फोट घेतल्यानंतर श्वेतानं 2013 मध्ये अभिनव कोहलीसोबत लग्न केले, परंतु 2019 मध्ये त्यांच्या वैवाहिक जीवनात अडचणी निर्माण झाल्या. आता दोघेही वेगळे राहत आहेत. श्वेता आणि अभिनवचा 6 वर्षांचा मुलगा असून त्याचे नाव रेयांश आहे.