Adipurush Box Office Collection : वादात अडकूनही `आदिपुरुष`चं बॉक्स ऑफिस कलेक्शन मस्तच! तिसऱ्या दिवसाची कमाई पाहाच
Adipurush Box Office Collection Day 3 : कोण म्हणतंय आदिपुरुष फ्लॉप ठरलाय? वादाच्या भोवऱ्यात अडकूनही आदिपुरुष या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तिसऱ्या दिवशी ही या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर कमाल केली असून एकदा कमाईची आकडेवारी पाहाच...
Adipurush Box Office Collection News In Marathi : भारतीय हिंदू संस्कृतीतील प्रसिद्ध पौराणिक महाकाव्य 'रामायण' वर आधारित 'आदिपुरुष' (Adipurush) हा चित्रपट 16 जून रोजी देशभरात आणि परदेशात प्रदर्शित झाला आहे. प्रभास, क्रिती सॅनॉन आणि सैफ अली खान अभिनीत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर शानदार ओपनिंग केली आहे. या चित्रपटाने जगभरात 140 कोटींची कमाई करत दणक्यात शुभारंभ केला आहे. तर दुसऱ्या दिवशी ही भारतातील प्रादेशिक भाषांमध्ये 65 कोटींची कमाई करत आदिपुरुषने हिंदी बॉक्स ऑफिसवरही चांगली कामगिरी केली आहे. (Adipurush Box Office Collection )
महाकाव्य रामायणावर आधारित या चित्रपटात प्रभास राघवच्या (Prabhas Raghav) भूमिकेत, क्रिती सॅनन (Kriti Sanon) जानकीच्या भूमिकेत आणि रावणाच्या भूमिकेत सैफ अली खान आहे. तर सनी सिंगने शेषची भूमिका साकारली असून देवदत्तने बजरंगची भूमिका केली आहे. तेजस्विनी पंडित आणि तृप्ती तोरडमल या इतर अभिनेत्रींनी 500 कोटी रुपयांच्या बजेट असणाऱ्या चित्रपटात छोट्या पण महत्त्वपूर्ण अशा व्यक्तिरेखा साकारल्या आहेत.
आदिपुरुष हा चित्रपट रिलीज झाल्यापासून ट्रोलिंगचा सामना करत आहेत. या चित्रपटाचे व्हिज्युअल इफेक्ट्स आणि संवादावर लोकं टीका करताना दिसून येत आहे. तसेच समीक्षकांनी देखील या चित्रपटाला हवी तितकी चांली रेटिंग दिलेली नाही. तरीही हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर मस्तच कमाल केली आहे. दरम्यान बॉक्स ऑफीस कलेक्शनच्या बाबतीत आदिपुरुषचा ओपनिंग डे चौथ्या क्रमांकावर आहे.
दरम्यान आदिपुरुषाने पहिल्याच दिवशी जगभरात 140 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. तर दुसऱ्या दिवशी 100 कोटींची कमाई झाली आहे. अवघ्या दोन दिवसां या चित्रपटने जगभरात 240 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर तिसऱ्या दिवशी कमाईचा 300 कोटींचा टप्पा पार केला आहे. या चित्रपटातील डायलॉग्सवर आक्षेप घेतल्यानंतर अखेर निर्माते-दिग्दर्शकांनी ते बदलण्याचा निर्णय घेतला. यावेळी संवादलेखक मनोज मुंतशीर यांनी ट्विट करत डायलॉग बदलणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
या आठवड्यात 'आदिपुरुष' शिवाय दुसरा कोणताही मोठा चित्रपट आठवड्यात प्रदर्शित न झाल्याने त्याचा फायदा या चित्रपटाला झाला. चित्रपटाने वीकेंडला चांगलीच कमाई केली असून अजय देवगणचा 'मैदान' हा चित्रपट २३ जूनला प्रदर्शित होणार आहे. त्यामुळेच या चित्रपटाची जादू शुक्रवारपर्यंत प्रेक्षकांल राहील की नाही ते लवकरच कळेल.