Adipurush box office collection News In Marathi : प्रभास, क्रिती सेनॉन आणि सैफ अली खान स्टारर 'आदिपुरुष' (Adipurush) हा चित्रपट प्रदर्शित होऊन पाच दिवस झाले असून या चित्रपटावरुन वाद सुरु आहेत. 16 जून रोजी प्रदर्शित झालेल्या चित्रपटावरून कधी यामधील संवाद तर कधी यातील पात्रांवर टीका होत आहे. तर अनेक ठिकाणी चित्रपटावर बंदी घालण्याची देखील मागणी होत आहे. आता हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मोठा वाद सुरु झाला आहे. सुरुवातीला चित्रपटाने मोठ्या प्रमाणावर कमाई केली होती. मात्र पाच दिवसानंतर 'आदिपुरुष' चित्रपटाची जादू ओसरल्याचे पाहायला मिळत आहे. (Adipurush box office collection Day 5) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'आदिपुरुष' वरुन सुरु झालेल्या वादामुळे लोक या चित्रपटाकडे पाठ फिरवत आहे. चित्रपटाचे घटणारे कलेक्शन पाहून लोक आता हा चित्रपट पाहत नसल्याचं दिसत आहे. चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगमध्येही घट झाली आहे. अशा परिस्थितीत तब्बल 600 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तगड्या स्टारकास्टला घेऊन बनवलेला चित्रपट खर्चाची रक्कम वसूल करू शकेल का, अशी शंका उपस्थित होत आहे.  


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Om Raut (@omraut)


आतापर्यंत बॉक्स ऑफिस कलेक्शन... 


'आदिपुरुष' हा चित्रपट 16 जून 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रदर्शित होऊन पाच दिवस पूर्ण झाले आहेत. मात्र  या चित्रपटाची दिवसेंदिवस बॉक्स ऑफिसवरील जादू कमी होत चालली आहे. 'आदिपुरुष' रिलीजच्या पहिल्या दिवशी 86.75 कोटी, दुसऱ्या दिवशी 65.25 कोटी, तिसऱ्या दिवशी 29.03 कोटी, चौथ्या दिवशी 16 कोटी आणि पाचव्या दिवशी 10.80 कोटींची कमाई केली आहे. एकंदरीत या सिनेमाने आतापर्यंत 247.90 कोटींचा गल्ला जमवला आहे.


देशभरात 'आदिपुरुष' या चित्रपटाला विरोध दर्शविला जात आहे. ऑल इंडिया इंडियन सिने वर्कर्स असोसिएशनने सिनेमावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. या सर्व गोष्टींची सिनेमाच्या कमाईवर मात्र परिणाम होत असून 500 कोटींच्या बजेटमध्ये निर्मिती करण्यात आलेला हा  सिनेमा आता किती कोटींची कमाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


ओम राऊत दिग्दर्शित की चित्रपटाची प्रचंड चर्चा होती. दोन वेळा टीझर आणि दोन वेळा ट्रेलर दुरुस्त केल्यानंतर चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. पण तरीही प्रेक्षकांना भावला नाही. तसेच चित्रपटातील संवादांमुळेच नेटकरी संताप व्यक्त करत आहेत.