Adipurush साठी प्रभासने घेतले इतके कोटी, मानधनाचा आकडा एकूण धक्का बसेल
प्रभासपासून सैफ अली खानपर्यंत... `आदिपुरुष`साठी घेतायत इतके भरमसाठ मानधन, फिसचा आकडा एकूण थक्क व्हाल
मुंबई : ओम राऊत यांचा प्रसिद्ध चित्रपट 'आदिपुरुष' (Adipurush) सध्या खुप चर्चेत आहे. या सिनेमात एकीकडे प्रभासच्या (Prabhas) प्रभू श्री रामाच्या भूमिकेचे कौतूक होतेय, तर सैफ अली खानच्या (Saif Ali Khan) रावणाच्या लूकवर टीका होतेय. त्यामुळे हा सिनेमा कुठेतरी वादाच्या भोवऱ्यात सापडताना दिसत आहे. दरम्यान तुम्हाला हे माहितीय का, आदिपुरुषसाठी कलाकार किती मानधन घेतायत ते, नाही ना, चला तर मग जाणून घेऊयात.
'आदिपुरुष' (Adipurush) या बिग बजेट चित्रपटात साऊथचा सुपरहिट अभिनेता प्रभास (Prabhas) 'राम', क्रिती सेनन (kriti sanon) 'जानकी' आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) 'रावण'च्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचा टीझर नुकताच रीलीज झाला आहे. या टीझरची खुप चर्चा आहे.
Adipurush चा टीझर पाहून रामायणातील 'सीता' भडकली, म्हणाली "रावण मुघल.."
प्रभासची फिस किती?
'बाहुबली' आणि 'बाहुबली 2' या चित्रपटांच्या यशानंतरच प्रभासने (Prabhas) आपली फी वाढवली होती. 'आदिपुरुष'साठी त्यांनी निर्मात्यांसमोर 100 कोटी रुपयांची मागणी ठेवली होती. ही त्याची मागणी पूर्ण झाल्याची माहिती मीडिया रिपोर्टनुसार मिळाली आहे. या मानधनानंतर प्रभास (Prabhas) या चित्रपटातील सर्वात महागडा अभिनेता ठरला आहे.
क्रिती सेनॉनचं मानधन किती?
जानकीची भूमिका साकारणाऱ्या या चित्रपटात प्रभाससोबत क्रिती सेनॉन (kriti sanon) दिसणार आहे. या चित्रपटासाठी क्रिती 3 कोटी रुपये मानधन घेत आहे. क्रिती सेनॉन (kriti sanon) सिताच्या व्यक्तिरेखेत प्रेक्षकांनी आवडली आहे.
सैफची फिस किती?
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) या चित्रपटात रावणाची भूमिका साकारत आहे. या भूमिकेतील त्याचा लुक पाहून बरीच खिल्ली उडवली जात आहे. तरी या चित्रपटासाठी तो 12 कोटी रुपये फी घेत आहे. प्रभासनंतर सर्वाधिक फी घेणारा तो दुसरा अभिनेता आहे.
सनी सिंगची फिस किती?
या चित्रपटात सनी सिंगही दिसणार आहे. 'आदिपुरुष'मध्ये तो लक्ष्मणची भूमिका साकारत आहे. या चित्रपटासाठी तो 1.5 कोटी रुपये घेत आहे. दुसरीकडे सोनल चौहानला 50 लाख रुपये देण्यात आले आहेत.
दरम्यान 450 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला 'आदिपुरुष' (Adipurush) 2डी, 3D, 3D IMAX सारख्या डझनभर भारतीय भाषांमध्ये एकाच वेळी प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट 12 जानेवारी 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.