मुंबई : टीव्ही अभिनेत्री मोहित मलिक आणि अदिती मलिक हे नुकतेच नवजात बाळाचे पालक झाले आहेत. अदितीने 29 एप्रिल रोजी एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. याची माहिती स्वतः मोहित आणि अदितीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर फोटो पोस्ट केला आहे. बाळाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत लवकरच बाळाचं नाव ठेवणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलं. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अदिती मलिकने ऑफिशिअल इंस्टाग्रामवर फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत बाळाचे डोळे दिसत आहेत. या फोटोत अदितीने कविता देखील पोस्ट केली आहे. तिने लिहिलं आहे की,'माझं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं आहे. जेव्हा मी या जगाला तुझ्या नजरेने पाहते. तुझे डोळे मला नवीन गोष्ट सांगते. तुझी नजर इथे तिथे काहीतरी शोधत असते. जेव्हा तू मला पाहतोस मला खूप छान वाटतं.'



अदितीच्या या इंस्टाग्राम पोस्टला खूप लोकांनी पसंत केलं आहे. यावर कमेंट करत आहेत. या अगोदरही तिने सोशल मीडियावर अनेक फोटो पोस्ट केले आहे. यामध्ये मोहित मलिक देखील दिसत आहे.



अदितीने हॉस्पिटलमधील देखील फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये बाळाचा चेहरा ब्लर केलं आहे. अदितीने आपली प्रेग्नेंसी खूप छान एन्जॉय केल्याचं दिसतं.