...आणि तो; लग्नांच्या चर्चांमध्ये अदिती राव हैदरीनं शेअर केला खास फोटो
Aditi Rao Hydari-Siddharth : अदिती राव हैदरीनं लग्नाच्या चर्चांमध्ये सोशल मीडियावर शेअर केला तो फोटो...
Aditi Rao Hydari-Siddharth Marriage: गेल्या बऱ्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये असणारी बॉलिवूड अभिनेत्री अदिती राव हैदरी आणि सिद्धार्थनं गुपचुप लग्न केलं अशी चर्चा सुरु होती. त्यात आता अदितीनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत एक खुलासा केला आहे.
रिपोर्ट्सनुसार, दोघांनी श्री रंगानायकस्वामी मंदिराच लग्न केलं. एकीकडे त्यांच्या चाहत्यांना त्या दोघांच्या लग्नाच्या फोटोंची प्रतिक्षा होती. त्यात आता स्वत: अदितीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अदितीनं सिद्धार्थसोबतचा एक छान फोटो शेअर केला आहे. या फोटोत अदिती आणि सिद्धार्थ यांनी त्यांची एन्गेजमेंट रिंगचे फोटो शेअर केले होते. तर हा फोटो शेअर करत अदिती म्हणाली " तो हो म्हणाला, साखरपुडा झाला."
दरम्यान, अदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ यांच्याविषयी काल चर्चा होती की त्या दोघांनी काल 27 मार्च रोजी तेलंगनामधील मंदिरात गुपचुप लग्न केलं. एकीकडे ही बातमी मिळाल्यानंतर त्यांच्या चाहत्यांना त्यांच्या लग्नाच्या फोटोंची अपेक्षा होती तर दुसरीकडे अदितीनं फोटो शेअर करत त्यांच्या नात्याची कबूली दिली आहे. अदिती आणि सिद्धार्थ या दोघांची भेट 2021 मध्ये प्रदर्शित झालेल्या तेलगू, तमिळ चित्रपच 'महा समुद्रम' चित्रपटादरम्यान, झाली होती. या चित्रपटात ते दोघं एकत्र दिसले होते. त्याशिवाय चित्रपटसृष्टीतील अनेक कार्यक्रमांमध्ये ते एकत्र स्पॉट झाले. त्याशिवाय ते अनेकदा सोशल मीडियावर एकमेकांचे फोटो शेअर करताना दिसतात. त्या दोघांचे फोटो आणि व्हिडीओ प्रेक्षकांना प्रचंड आवडतात.
हेही वाचा : जया आणि नव्याचा श्वेताशी झाला वाद, 'या' कारणामुळे बिग बींच्या लेकीला आला राग
अदिती आणि सिद्धार्थच्या कामाविषयी बोलायचे झाले तर अदिती सगळ्यात शेवटी सिनामिरामध्ये दिसली होती. हा चित्रपट 2022 मध्ये प्रदर्शित झाला होता. आता ती लवकरच हीरामंडी या दिसणार आहे. लवकरच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारखेची घोषणा करण्यात येणार आहे. तर याशिवाय ती लायनेसमध्ये देखील दिसणार आहे. हा एक इंग्रजी चित्रपट आहे. तर सिद्धार्थविषयी बोलायचे झाले तर तो सगळ्यात शेवटी चिट्ठामध्ये दिसला होता. हा चित्रपट चांगला हिट झाला. आता तो 'इंडियन 2' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात कमल हासन महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.