मुंबई : सिने इंडस्ट्रीत कास्टिंग काऊच ही लागलेली कीड. या अगोदर अभिनेत्री या प्रश्नावर बोलणं टाळत. पण आता अनेक सिनेकलाकार यावर अगदी मोकळेपणाने बोलतात. आताच कास्टिंग काऊचच्या मुद्यावर 'पद्मावत' सिनेमातील मेहरूनिसाचे पात्र साकारणारी अभिनेत्री अदिती राव मोकळेपणाने बोलली आहे. तिने तिचा अनुभव शेअर केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अदितीने सांगितल्यानुसार, स्ट्रगलच्या दरम्यान तिला अनेकदा कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला होता. मी जेव्हा मुंबईत आली होती तेव्हा मला 4 महिन्यांतच काम मिळालं होतं. मात्र यानंतर मला कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला होता. कास्टिंग काऊचमुळे मला अनेक सिनेमांत काम मिळालं नाही. त्यानंतर मला तब्बल 8 महिने काम मिळालं नाही. मात्र मी हरले नाही अधिक कठोर झाले. मी अनेक दिवस रडत राहिले कारण कुणी माझ्यासोबत असं कसं वागू शकतात यावर माझा विश्वासच बसत नव्हता. 


अदितीकरता 2013 हे वर्ष खूप कठीण होतं. यावर्षी माझे वडिल वारले त्यानंतर 2014 मध्ये सगळ्या गोष्टी सुरळीत होऊ लागल्या. कास्टिंग काऊचमुळे मी अपसेट होती कारण कुणी मुलींकडे अशी मागणी कशी करू शकतं? अदितीने कायमच या सगळ्याविरोधात आवाज उठवला आहे. ज्या व्यक्तीकडे सत्ता आहे ती व्यक्ती चुकीची वागते. मात्र कधी कुणाचं नाव घेतलं नाही. अदिती रावला सिनेसृष्टीत 7 वर्षे झाली आहेत. 'ये साली जिंदगी' मधून डेब्यू केला आहे.