मुंबई : गायक उदित नारायण आजोबा तर अभिनेता आदित्य नारायण बाबा झाला आहे. आदित्यची पत्नी श्वेता अग्रवालने (Shweta Agarwal) एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. श्वेताने 24 फेब्रुवारी रोजी मुंबईत मुलीला जन्म दिला. आदित्यने सोशल मीडियानर आतापर्यंत बाबा झाल्याची माहिती दिली नाही. शिवाय त्याने मुलीचा फोटो देखील शेअर केलेला नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुलीच्या जन्मानंतर आदित्य म्हणाला, 'मला मुलगीचं हवी होती. देवाने माझं ऐकलं आणि माझी इच्छा पूर्ण झाली आहे. मुली कायम वडिलांच्या फार जवळ असतात. आता चिमुकली आली आहे. त्यामुळे मी आणि श्वेता आनंदी आहोत...'



आदित्य पुढे म्हणाला, 'डिलिवरीच्या वेळी मी श्वेतासोबत होतो. तेव्हा मला जाणवलं बाळाला जन्म देण्यासाठी महिलांमध्ये वेगळी ताकद असते. त्या दिवसानंतर माझ्या मनात श्वेताबद्दल असलेला आदर आणखी वाढला आहे...'


मुलीच्या जन्मानंतर आदित्यने व्यक्त केलेल्या भावनांनंतर प्रत्येक पतीच्या मनात अशीच  भावना उपजावी... श्वेता आण आदित्यबद्दल सांगायचं झालं तर दोघे लग्नाआधी 10 वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर लग्न करत दोघांनी नात्याला वेगळं नाव दिलं.