मुंबई : गेल्या काही दिवसांपासून गायिका नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंग यांच्या विवाहसोहळ्याच्या बऱ्याच चर्चांनी जोर धरला. ज्यानंतर सोशल मीडियावर नेहा आणि रोहनप्रीतच्या रिसेप्शन सोहळ्याची पत्रिकाही व्हायरल झाली. या पत्रिकेनुसार नेहा आणि रोहनप्रीतच्या रिसेप्नशन सोहळ्याची ताऱीख आणि ठिकाण सर्वांसमोर आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२६ ऑक्टोबरला पंजाबमधील मोहाली येथील The Amaltas येथे हा सोहळा पार पडणार असल्याचं या पत्रिकेत लिहिल्याचं स्पष्ट होत आहे. काही फॅनपेजेसवरुन नेहा आणि रोहनप्रीतच्या विवाहसोहळ्यासंबंधीची, रिसेप्शनची निमंत्रण पत्रिका पोस्ट करण्यात आली असून, हे फोटो कमालीचे व्हायरलही होत आहेत. पण, अद्यापही त्याबाबतची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तूर्तास चाहत्यांनी मात्र या व्हायरल पोस्टच्याच बळावर आनंद व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. 


टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार खुद्द आदित्य नारायण यानंच नेहा आणि रोहनप्रीतच्या लग्नाबाबतची माहिती दिली होती. दिल्लीमध्ये त्यांचा हा विवाहसोहळा पार पडणार असून, विशाल ददलानी आणि हिमेश रेशमिया यांचीही या सोहळ्याला उपस्थिती असणार आहे अशी माहिती त्यानं दिली. 



 


खुद्द आदित्यनंही नेहा आणि रोहनप्रीतच्या लग्नसोहळ्याला उपस्थिती लावण्याची इच्छा व्यक्त केली. पण, दुखापतीमुळं दिल्लीत पार पडणाऱ्या या विवाहसोहळ्याला त्याच्या उपस्थितीबाबत अद्यापही साशंकता आहे. नेहा आणि रोहनप्रीतनं सोशल मीडियावर त्यांच्या नात्याबाबतची उत्सुकता चांगलीच शिगेला पोहोचवली आहे. आता पुढं त्यांच्या या नात्याबाबतची नेमकी कोणती माहिती समोर येते याकडेच चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.