Adult film star Sophia Leone Dead : अ‍ॅडल्ट स्टार सोफिया लियोनीचं निधन झालं आहे. वयाच्या 26 व्या वर्षी सोफियानं अखेरचा श्वास घेतला. तिच्या सावत्र वडिलांनी तिच्या निधनाच्या बातमीची पुष्टी केली आहे. रिपोर्ट्सनुसार, जेव्हा सोफिया लियोनीच्या कुटुंबानं तिच्याशी फोनवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा तिनं उत्तर दिलं नाही. त्यानंतर तिच्या फ्लॅटवर जेव्हा ते गेले तेव्हा ती मृतावस्थेत तिथे भेटली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या घटनेनंतर सोफिया लियोनीचे सावत्र वडील माइक रोमेरोनं GoFundMe वर याविषयी माहिती दिली. जिथे तिच्या मेमोरियलसाठी पैसे गोळा करण्यात येत आहेत. या सगळ्या प्रकरणाचा सध्या तपास सुरु आहे. दरम्यान, सोफियाच्या निधाच्या कारणावरुन वाद सुरु आहे, कारण गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक एडल्ट स्टार्सचे निधन झाल्याची घटना समोर आली आहे. 



गेल्या महिन्यात मियामीमध्ये राहणाऱ्या सोफिया लियोनी ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसले होते. त्यावर तिनं अनेक पोस्ट शेअर केले होते. सोफियाच्या सावत्र वडिलांनी तिच्यासाठी करण्यात येत असलेल्या फंडिगच्या पेजवर तिच्या निधनाच्या बातमीची पुष्टी केली होती. त्यांनी म्हटलं की 'तिची आणि आणि संपूर्ण कुटुंबाच्या वतीने, आमच्या लाडक्या सोफियाच्या निधनाची बातमी सांगताना माझं अंतःकरण भरून आलं आहे. सोफियाच्या आकस्मित मृत्यूने तिच्या कुटुंबातील सदस्यांना आणि मित्रांना धक्का बसला आहे. सोफियाला तिच्या कुटुंबानं तिच्या फ्लॅटमध्ये 1 मार्च रोजी बेशुद्ध अवस्थेत पाहिलं. तिच्या निधनानंतर पोलिस या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहे.' 


हेही वाचा : घटस्फोटानंतर मलायकाला पोटगीत मिळाली मोठी रक्कम? 7 वर्षांनंतर अभिनेत्रीनं केला खुलासा


दरम्यान, गेल्या तीन महिन्याच्या काळात अ‍ॅडल्ट फिल्म इंडस्ट्रीमध्ये झालेले हे चौथं निधन आहे. याआधी काग्री लिन कार्टरनं वयाच्या 36 व्या वर्षी आत्महत्या केली होती. त्याआधी जानेवारीमध्ये जेसी जेन कोअप ही प्रेमी ब्रेट हसनमुलरसोबत मृत अवस्थेत सापडली होती. त्याशिवाय फेब्रुवारीमध्ये एडल्ट फिल्म इंडस्ट्रीतील एमली विलिसला देखील ओव्हरडोजमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तर तिला लगेच वेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. त्यात आता सोफिया लियोनीच्या निधनानं सगळ्यांना मोठा धक्का बसला आहे. तिच्या निधनाचं कारण काय आहे हे तिच्या चाहत्यांना जाणून घ्यायचं आहे इतकंच नाही तर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी तिच्या निधनानं दु:ख झाल्याचं म्हटले आहे.