मुंबई :  टारझन सिनेमामुळं फेमस झालेले सिने अभिनेते हेमंत बिर्जे यांच्या गाडीला मुंबई-एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात झाला. सुदैवानं ते थोडक्यात बचावले. सर्दीवरचं औषध घेऊन ते गाडी चालवत होते. त्याचाच फटका त्यांना बसला. नेमकं काय झालं हे आपण सविस्तर जाणून घेऊयात. (adventure of tarzan fame film  actor hemant birje car accident on mumbai pune expressway at urse toll plaza)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हेमंत बिर्जे पवना हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. हेमंत बिर्जे हे सिने अभिनेते. टारझन चित्रपटातली त्यांची भूमिका तुफान गाजली होती. मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर उर्से गावाजवळ त्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला. या अपघातात त्यांची पत्नी अमना आणि मुलगी रेश्मा यांनाही दुखापत झाली. 



हा अपघात इतका भीषण होता की, गाडीचा पार चेंदामेंदा झाला. कुटुंबीयांसह मुंबईहून पुण्याला जाताना त्यांनी रस्त्यात सर्दीवरचं औषध आणि काही गोळ्या घेतल्या.या औषधांमुळं त्यांना झोप येऊ लागली. त्यांचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि हा भीषण अपघात झाला. 


सध्या ताप, सर्दी आणि खोकल्याची साथ पसरली आहे. प्रवास करण्याआधी तुम्ही देखील असं एखादं औषध घेऊन गाडी चालवत असाल तर झोप येऊन अपघात होण्याची शक्यता आहे.  त्यामुळं औषध घेऊन गाडी चालवू नका, असा सल्ला डॉक्टर देतात. हेमंत बिर्जे यांच्या अनुभवातून आपण सगळ्यांनी शहाणं व्हायला हवं. त्यांनी औषध घेऊन गाडी चालवण्याची चूक केली, ती आपण टाळायला हवी.