`आम्ही सारे खवय्ये`च्या सेटवर अद्वैत दातारकर भावूक
अद्वैत- भक्तीने एकमेकांना दिलं वचन
मुंबई : सगळीकडे दिवाळीचा उत्साह आहे. कितीही बिझी शेड्युलमधून वेळ काढून कुटुंबासोबत वेळ घालवतात. पण कलाकार मंडळींना सणांमध्ये देखील या गोष्टी शक्य नसतात. मालिका, सिनेमा, नाटकं अशा वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारा अभिनेता अद्वैत दातारकर व्यस्त असतो. झी मराठीच्या 'आम्ही सारे खवय्ये' या कार्यक्रमात अद्वैतला खूप छान सरप्राईज मिळालं. त्यामुळे तो खूप भावूक झाला आहे.
अद्वैत दातारकर आणि त्याची पत्नी भक्ती देसाई 'आम्ही सारे खवय्ये'च्या दिवाळी विशेष कार्यक्रमात आले होते. यावेळी अद्वैत कामात व्यस्त असल्यामुळे मुलगी मीराला वेळ देऊ शकत नसल्याची खंत व्यक्त करतो. यावेळी खवय्येची टीम मीराला सेटवर घेऊन येतात आणि अद्वैतला खास सरप्राईज देतात.
असोत अनेक किंवा असावी एकुलती एक
बापासाठी नेहमीच खास असते लेक
या कॅप्शनखाली झी मराठीच्या फेसबुक पेजवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये अद्वैतची गोंडस मुलगी मीरा बाबाला खास सरप्राईज देते.
तसेच या कार्यक्रमात अद्वैत आणि भक्तीने खूप चांगला वेळ घालवला आहे. तसेच त्यांनी एकमेकांना वचन देखील दिलं आहे. तो क्षण इतका भावूक होता की, दोघांच्या डोळ्यात पाणी आलं. अद्वैत दातारकर 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत राधिकेचा मित्र सौरभची भूमिका साकारत आहे. आता राधिका आणि सौरभ लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत.
अद्वैत या मालिकेत सगळ्यांचा आवडता आहे. 'सरप्राईज मॅन' म्हणून त्याची ओळख आहे. राधिका आणि सौरभचा साखरपुडा झाला असून तो पत्नीला खंबीरपणे साथ देणाऱ्या जोडीदाराची भूमिका बजावत आहे.