मुंबई : अभिनेता सलमान खान (Salman Khan) याच्या 'लवयात्री' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर फारसा कमाल करु शकला नाही. पण, या चित्रपटाच्या निमित्तानं एक सौंदर्यवती बॉलिवूडमध्ये आली. या अभिनेत्रीचं नाव वरीना हुसैन (Warina Hussain). 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वरीना मुळची अफगाणिस्तानची. पण, कलेच्या आणि करीअरच्या उद्देशानं तिनं भारत गाठला. माध्यमांशी संवाद साधला असताना तिनं आपली सुरुवातीच्या दिवसांमध्ये जोरदार खिल्ली उडवली गेल्याचं सांगितलं होतं. ती अफगाणिस्तान (Afghanistan) मधून आल्यामुळं तिची खिल्ली उडवली जात होती. 




दहशतवादी आणि सतत बॉम्ब स्फोट होणाऱ्या राष्ट्राचून आल्याचं म्हणत तिला हिणवलं जात होतं. हे सारं पाहून तिला एका वळणावर फार दडपणही आलं. आपण अफगाणिस्तानमध्ये काही काळ वास्तव्य केलं होतं, नंतर आई आणि आजी आपल्याला अफगाणिस्तानातील काही गोष्टी, घटनांबद्दलही सांगत असे असं तिनं सांगितलं होतं. 


वरीना सोशल मीडियावर सक्रिय होती, पण मागील काही महिन्यांमध्ये मात्र तिचे फारसे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले नव्हते. तिच्या रुपाची एक झलकच पाहणाऱ्याच्या काळजाचा ठोका चुकवते. निळेशार डोळे, लाघवी हास्य आणि चेहऱ्यावरील निरागसता हे तिच्या रुपाचे गुणविशेष. अशा या सौंदर्यवतीचे फोटो इंटरनेटवर अफगाणिस्तान संघर्षाच्या (Afganistan Crisis) दरम्यानच समोर आले असून, यावरच अनेकांच्या नजरा खिळत आहेत.



अफगाणिस्तानमध्ये बॉलिवूडला पसंती 
वरीनानं दिलेल्या माहितीनुसार अफगाणिस्तानमध्ये बॉलिवूड चित्रपटांना चांगलीच पसंती मिळते. तिथं भारतीय चित्रपट पाहूनच फॅशनचा ट्रेंड बदलतो, असंही तिनं सांगितलं होतं. इतकंच नव्हे, तर तिथं बेल बॉटम पँटला तिथे अमिताभ बच्चन पँट या नावानंही ओळखलं जातं, असं ती म्हणाली होती.