मुंबई : बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या काही काळ पडदा गाजवतात,त्यानंतर अचानक नाहीशा होतात.अशाच एकेकाळी पडदा गाजवलेल्या व बॉलिवूडमध्ये सक्रिय नसलेल्या अभिनेत्रीचा नवीन लुक समोर आला आहे. हा लुक पाहून चाहते थक्क झाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आफताब शिवदासानीसोबत फोटोत दिसणारी ही अभिनेत्री आमना शरीफ आहे. आमनाने एकेकाळी टीव्ही आणि म्युझिक अल्बममध्ये धुमाकूळ घातला होता. तिच्या सौंदर्यावर आणि अभिनयावर चाहते मनं हरपून जायचे. नंतर तिने चित्रपटांमध्येही नशीब आजमावले होते. अनेक चित्रपटांमध्ये ती दिसली होती. 


आलू चाट या चित्रपटात ती अभिनेता आफताब शिवदासानीसोबत चाहत्यांना हसवताना दिसली होती. मात्र तीचित्रपटांमध्ये काही विशेष करू शकली नाही. नंतर तिने टीव्हीवर पुनरागमन केले होते. 'कहीं तो होगा'मध्ये कशिश आणि 'कसौटी जिंदगी की 2'मध्ये कोमोलिकाच्या भूमिकेतून तिने चाहत्यांची मने जिंकली होती. आमना शरीफने केवळ सकारात्मक भूमिकाच केल्या नाहीत तर निगेटिव्ह भूमिकांमध्येही ती चाहत्यांना खूप आवडली.


नवीन लुक 
आमना शरीफ इंस्टाग्रामवर खूप सक्रिय असते. सोशल मीडियावर फोटो पोस्ट करून ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. फोटोमध्ये चाहत्यांना तिचा स्टायलिश लूक आवडतो. त्याचबरोबर आमनाचा फॅशन सेन्सही अप्रतिम आहे. ती प्रत्येक लूकमध्ये खूप सुंदर दिसत असते. मात्र आता फोटोत दिसणारी आमना शरीफ आणि आताची आमना हिच्यात खुप मोठा फरक झाला आहे. नवीन लुकमध्ये तिला ओळखताही येत नाही. चाहत्यांना ही तिच अभिनेत्री आहे का असा प्रश्न पडलाय. 



दरम्यान आमना शरीफचे इन्स्टाग्रामवर खुप चाहते आहेत. या चाहत्यांसाठी नेहमीच ती फोटो पोस्ट करत असते. तिच्या या फोटोवर तुफान लाईक्स आणि कमेंटस येत असतात.