मुंबई : तनुश्री दत्ताने 10 वर्षानंतर अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यामुळे तनुश्री आणि नानाचं समर्थन करणार दोन गट बॉलीवुडमध्ये पाहायला मिळत आहेत. आपण तनुश्रीला कायदेशीर नोटीस पाठवणार असल्याचे नानांनी म्हटले होते. पण 'मला आतापर्यंत कोणती कायदेशीर नोटीस मिळाली नसून माझ्यावर दबाव आणणं त्यांनी बंद करावं', असं तिने एएनआयला सांगितलं. 'माझ्या हक्काचं रक्षण करण्यासाठी मी आणि माझी वकिलांची टीम लक्ष कारवाईवर केंद्रीत करुन आहोत', असेही ती म्हणाली.


काय म्हणाली तनुश्री ? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटाच्या सेटवर जवळपास दहा वर्षांपूर्वी नानांनी आपल्याशी असभ्य वर्त केल्याचा आरोप तनुश्रीने केला होता. त्याशिवाय त्यावेळी आपल्या पाठिशी कोणीच उभं राहिलं नसल्याचं म्हणत तिने चित्रपटाच्या निर्माते- दिग्दर्शकांवरही निशाणा साधला होता.


नाना पाटेकर यांनी माझ्याशी असभ्य वर्तन केलं हे अनेकांनी पाहिलं पण कोणीही माझ्यामागे उभं राहिलं नाही, सगळ्यांनीच केवळ बघ्याची भूमिका निभावली असं ती म्हणाली होती.


नाना पाटेकर सेटवर अभिनेत्रींशी असभ्य वर्तन करतात, अनेकींना त्यांनी मारहाण केली आहे. कलाविश्वात अनेकांनाच त्यांच्या या स्वभावाची कल्पना आहे, मात्र त्यांच्याविरुद्ध बोलण्याची हिंमत कोणीच करत नाही असा आरोप तिने केला होता.


नानांनी आरोप नाकारले 


नाना पाटेकर यांनी तनुश्री दत्ताने लावलेले सर्व आरोप नाकारले आहेत. नाना पाटेकरांनी सर्व आरोप फेटाळून जर तिला असं वाटत असेल तर तिने कायद्याने कारवाई करावी.


10 वर्षांनी लावलेल्या आरोपावर नाना म्हणाले की, एक व्यक्तीने अशा पद्धतीने वक्तव्य केल्यावर मी काय बोलणार? लैंगिक अत्याचार म्हणजे काय? एकाचवेळी आमच्यासोबत सेटवर 200 हून अधिक लोकं असायची.


त्यामुळे मी देखील कायद्याने काय करता येईल हे बघेन कारण कोणत्याही पद्धतीचा संवाद मला याबाबत करायचा नाही.