23 वर्षांनंतर बनणार अनिल कपूरच्या `या` फ्लॉप चित्रपटाचा सिक्वेल
अनिल कपूर आणि राणी मुखर्जी दोघंही फिल्म इंडस्ट्रीतले मोठे कलाकार आहेत.
मुंबई : आजपासून जवळ-जवळ २३ वर्ष आधी अनिल कपूर आणि राणी मुखर्जी एकत्र सिनेमा घेवून आले होते. बॉक्स ऑफिसवर तर सिनेमा फ्लॉप झाला होता. मात्र टीव्हीवर या सिनेमाने खूप धुमाकूळ घातला होता. आता या सिनेमाचा सिक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दोघंही या सिनेमात पुन्हा एकदा एकत्र स्क्रिन शेअर करणार आहे.
अनिल कपूर आणि राणी मुखर्जी दोघंही फिल्म इंडस्ट्रीतले मोठे कलाकार आहेत. आपल्या करिअरमध्ये दोघांनी एकत्र काही सिनेमात काम केलं होतं. दोघांचा सगळ्यात जास्त पॉप्युलर झाला. तो सिनेमा म्हणजे 'नायक'. 2001 साली हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. एस.शंकर दिग्दर्शिक नायक सिनेमा टीव्हीवर इतका गाजला की कोणी क्वचितच असेल ज्याने हा सिनेमा पाहिला नसेल, मात्र या सिनेमा संदर्भात एक मोठी बातमी समोर येतेय. असं बोललं जातंय की, लवकरच या सिनेमाचा सिक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
ए.एम रत्नम यांनी या सिनेमाची निर्मीती धुरा सांभाळली. प्रोड्यूसर दीपक मुकुटने सिक्वलसोबतच अजूनही बरेच राईट्स विकत घेतले आहेत. दीपकने 'धाकड़', 'थँकगॉड'सारखे सिनेमा प्रो़ड्यूस केले आहेत. आता त्यांचा 'नायक 2' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्वत: दिपक मुकुटे यांनी याबाबत खुलासा केला आहे.
नुकतीच दीपक मुकुटे यांनी सिनेमाची घोषणा करत म्हणाले, मी नायक सिनेमाच्या सिक्ववचं प्लानिंग करत आहे जुनी पात्रांसोबत हा सिनेमा मला पुढे न्यायचा आहे. मी खूप आधीच एएम रत्नम यांच्याकडून राईट्स विकत घेतसे आहेत. सध्या आम्ही मुख्य कलाकारांना डोळ्यासमोर ठेवून या सिनेमाची स्क्रिप्ट लिहीत आहोत. लेखनाचे काम पूर्ण होताच. आम्ही पुढचा निर्णय घेऊ. आमच्या मनात अनेक दिग्दर्शक आहेत, पण सध्या कोणीच फायनल झालेलं नाही. ,
अनिल कपूर आणि राणी मुखर्जीसोबत या सिनेमात अमरीश पुरी, परेश रावल, जॉनी लीवर सोबतच अनेक मोठ-मोठे कलाकार दिसले होते. या सिनेमाला टीव्हीवर खूप पसंती मिळाली मात्र बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा फ्लॉप झाला. बॉक्स इंडियाच्या रिपोर्टनुसार या सिनेमाचं बजेट २१ करोड होतं. मात्र वर्ल्डवाइड या सिनेमाने केवळ 20.56 करोड इतकी कमाई केली होती. दीपक यांनी स्वत: सिनेमाच्या सिक्वलवर शिक्कामोर्तब केलं आहे. या सिनेमाच्या निमीत्ताने अनिल कपूर आणि राणी मुखर्जी पुन्हा एकदा एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत.