शिक्षा सुनावताच बहिणींनी सलमानला दिली ही गोष्ट!
काळवीट शिकार प्रकरणी जोधपूर न्यायालयाने सलमान खानला दोषी ठरवले.
मुंबई : काळवीट शिकार प्रकरणी जोधपूर न्यायालयाने सलमान खानला दोषी ठरवले. वन्यजीवन कायद्याअंतर्गत सलमानला ५ वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. तर याचप्रकरणात आरोपी असलेल्या सैफ अली खान, तब्बू, नीलम, सोनाली बेंद्रे या कलाकारांची निर्दोष मुक्तता झाली. शिक्षा सुनावताच सलमान भावूक झाला. त्याला अश्रू अनावर झाले. त्यावेळेस त्याच्या सोबत असलेल्या त्याच्या बहिणीने अलविराने त्याला गॉगल घातला. तर जोधपूरला सलमानला आधार देण्यासाठी पोहचलेल्या अलविरा आणि अर्पिता या दोघी ओक्साबोक्सी रडल्या. पण याही स्थितीत भावाबद्दलची काळजी मनात असल्याने अलवीराने सलमानला पाणी आणि अंटी डिप्रेशनचे ओषधे दिली.
चार गुन्हे दाखल
सलमान खानविरोधात जोधपूर कोर्टात चार गुन्हे दाखल आहेत. तीन काळवीटाची शिकार केल्याप्रकरणी तर एक गुन्हा अवैध हत्यार बाळगल्याप्रकरणी करण्यात आला आहे.
ही झाली शिक्षा
अवैध हत्यार बाळगल्याप्रकरणी सलमानची निर्दोष मुक्तता करण्यात आली असली तर काळवीट शिकार प्रकरणी त्याला ५ वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.