मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासु (Bipasha Basu) तिचा पती आणि अभिनेता करण सिंग ग्रोव्हरसोबत तिच्या पहिल्या बाळाच्या स्वागताच्या तयारीत व्यस्त आहे. तिने काही काळापूर्वी चाहत्यांना तिच्या प्रेग्नंसीबद्दल सांगितले होते. तेव्हापासून बिपाशा तिच्या बेबी बंपचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. मात्र, एका नवीन व्हिडिओमुळे ती चांगलीच चर्चेत आहे. बिपाशाचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. 


बातमीची लिंक : शरद पवारांच्या 'त्या' वक्तव्यावर विवेक अग्निहोत्रीची खोचक टीका, म्हणाला...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिपाशाचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं शेअर केला आहे. या व्हिडीओत बिपाशा ही गाडीतून उतरताना दिसत आहे. त्यानंतर ती एका चिमुरड्यासोबत फोटो काढताना दिसते. यावेळी बिपाशानं हील्स परिधान केल्या आहेत. त्यामुळे आलियानंतर (Alia Bhatt) बिपाशाला सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. (After Alia Bhatt Bipasha Basu Gets Trolled For This Reasons During Pregnancy )


आणखी वाचा : करण जोहरबाबत शाहरुख खानचं मोठ वक्तव्य; 'होय, आम्ही एकत्र...'


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


आणखी वाचा : हात जोडून प्रार्थन करेन...; कथित MMS लीक होण्यावर अभिनेत्री संतापली!


नेटिझन्सचे म्हणत आहेत की महिलांना गर्भधारणेदरम्यान हील्स घालण्याची परवानगी नाही, परंतु बिपाशाने त्याच्या विरुद्ध जाऊन असं केलं. हे पाहून एक नेटकरी म्हणाला, 'तिच्या आणि आमच्या डॉक्टरांचे शिक्षण वेगळे आहे का? आम्हाला अगदी सुरुवातीपासून हील्स घालू नका असे सांगितले.' दुसरा नेटकरी म्हणाला,' 'गरोदरपणात हील्स घालणे टाळले पाहिजे.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'ती आलियापेक्षा चांगल्या ड्रेसमध्ये दिसत आहे.'


आणखी वाचा : 'या' अभिनेत्रींनी ऑनस्क्रीन बाप - बेटा दोघांसोबत केला रोमान्स, यादीतील चौथ्या क्रमांकाचं नाव वाचून व्हाल आवाक


2016 मध्ये बिपाशा आणि करण लग्न बंधनात अडकले. 'अलोन' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघे एकमेकांच्या जवळ आले होते. आता लवकर बिपाशा तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे.